अक्कलकोट: बोरी नदीत बुडालेल्या तरुणाचा मिळाला मृतदेह

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

शासनाच्या आपत्कालीन यंत्रणेची कोणतीही मदत व्यवस्थित न झाल्याने याबाबत खूप मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. शनिवारी पात्राजवळ पडलेल्या साहित्यावरून बुडालेला तरुण बाळासाहेबच असल्याचा संशय खरा ठरला. सुरवसे याच्या मागे पत्नी, आई, वडील, एक भाऊ आणि तीन बहिणी असा परिवार आहे.

अक्कलकोट : कुरनुर ता.अक्कलकोट येथील शेतीच्या कामासाठी गेलेल्या तरुणाचा शनिवारी दुपारी दम घोटून कुरनूर जवळच्या बोरी नदीत शनिवारी बुडालेल्या तरुणाचे मृतदेह फुगून अखेर रविवारी सायंकाळी ६.१५ वाजता पात्रात वर आला.

आनंद उर्फ बाळासाहेब लक्ष्मण सुरवसे (वय २३) असे या तरुणाचे नाव आहे. याची माहिती अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात सतीश राम सुरवसे यांनी दिली आहे. त्यात आकस्मिक मयत असे नोंद झाली आहे. तरुणाचा असा अकाली बुडून मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेने गावावर शोककळा पसरली आहे. शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास बाळासाहेब लक्ष्मण सुरवसे, वय २३ वर्षे  हा तरुण नदी पलीकडच्या शेतीला जाण्यासाठी नदी जवळ गेला त्यावेळी नदी तुडुंब भरून होती. नदीपालिकडे जाऊन येण्यासाठी तो पलीकडे पोहत गेला होता. केवळ हे टोक ते टोक अंतर जास्त असल्यामुळे मध्येच दम लागला त्यानंतर तो ओरडू करू लागला. त्यावेळी तो बुडाला. नंतर ही घटना गावाला कळली त्यानंतर गावकऱ्यांनी मृतदेह शोधण्याचा काल खूप प्रयत्न केला पण रात्रीपर्यंत सापडू शकला नाही. त्यामूळे कुटुंब सदस्य व गावकऱ्यांच्या चिंतेत भर पडली होती. आज दिवसभरही गावकरी, जलतरणपटू, अग्निशामक यंत्रासह उपविभागीय पोलिस अधिकारी प्रीतम यावलकर, पोलिस निरीक्षक सुरज बंडगर, अधिकारी व कर्मचारी यांनी प्रयत्न केले.पण मृतदेह फुगल्याने आपोआपच रविवारी सायंकाळी ६.१५ वाजता बाहेर आली.

शासनाच्या आपत्कालीन यंत्रणेची कोणतीही मदत व्यवस्थित न झाल्याने याबाबत खूप मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. शनिवारी पात्राजवळ पडलेल्या साहित्यावरून बुडालेला तरुण बाळासाहेबच असल्याचा संशय खरा ठरला. सुरवसे याच्या मागे पत्नी, आई, वडील, एक भाऊ आणि तीन बहिणी असा परिवार आहे.

अनेक शेतकऱ्यांची शेती ही नदीच्या पलीकडे आहे. नदीच्या अलीकडून फक्त पाच मिनिटात पोचतात पण भरपूर पाणी असलं की, ५ किलोमीटर वळसा घालून जावे लागते. त्यात तो कुरनूर चुंगी रस्ता पण धड नाही. यापुढे अशा घटना घडू नये म्हणून खबरदारी घ्यायला हवी. पुलाची आवश्यकता किती आहे हे बाळासाहेबच्या मृत्यूने कळले आहे अशी भावना कुरनुरकर व्यक्त करीत आहेत.

Web Title: Solapur news youth drown in Akkalkot