झेडपीचे 18 दांड्याबहाद्दर शिक्षक बडतर्फ 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

सोलापूर - सतत गैरहजर असल्याने यापूर्वी वेतनवाढी बंदची कारवाई करून देखील वर्तनात सुधारणा न केल्याने जिल्हा परिषदेच्या 18 शिक्षकांना सेवेतून मुक्त करण्यात आले आहे. 2015, 2016 पासून विना परवाना गैरहजर असलेल्या 18 शिक्षकांना बडतर्फ करण्याची कारवाई मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी केली आहे. 

सोलापूर - सतत गैरहजर असल्याने यापूर्वी वेतनवाढी बंदची कारवाई करून देखील वर्तनात सुधारणा न केल्याने जिल्हा परिषदेच्या 18 शिक्षकांना सेवेतून मुक्त करण्यात आले आहे. 2015, 2016 पासून विना परवाना गैरहजर असलेल्या 18 शिक्षकांना बडतर्फ करण्याची कारवाई मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी केली आहे. 

सेवेतून बडतर्फ करण्यात आलेल्या 18 शिक्षकांची नावे याप्रमाणे. कंसात जिल्हा परिषद शाळा नियुक्तीचे ठिकाण. जालिंदर भोसले (रेवेवाडी, ता. मंगळवेढा), ध. शि. मिसाळ (कारंडेवाडी, ता. सांगोला), म. श्री. कोळी (संजवाड, ता. दक्षिण सोलापूर), राजू पवार (गारवाड, ता. माळशिरस), बा. म. साबळे व मा. म. राऊत (मिरे, ता. माळशिरस), शा. ना. बगाडे (नारी, ता. बार्शी), व. लो. भोसले, (कुंभारगाव, ता. करमाळा), आ. म. शिंगे (भुईंजे, ता. माढा), प्र. ना. पवार (कडबगाव, ता. अक्कलकोट), श्री. अ. निंबाळकर (पोमलवाडी, ता. करमाळा), मनीषा अ. चौधरी (अरबळी, ता. मोहोळ), बा. शं. धांडोरे (खेडभाळवणी, ता. पंढरपूर), प्र. अ. साबळे (मानेवस्ती, ता. माळशिरस), रे. वि. सुतार (सिन्नूर, ता. अक्कलकोट), संपत आसबे (मो. वस्ती गार्डी, ता. पंढरपूर), म. म. निंबाळकर (टाकळी टें. ता. माढा), नि. सु. कोळी (मैंदर्गी, ता. अक्कलकोट). 

टाकळीमधील गौण खनिजप्रकरणी तीन ग्रामसेवक निलंबित 
पंढरपूर तालुक्‍यातील टाकळी (ल.) येथे कार्यरत असताना गौण खनिज निधीत अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन तीन ग्रामसेवकांना आज निलंबित करण्यात आले आहे. त्यामध्ये यु. डी. भोसले ( कालावधी : 24 जून 2016 ते 28 जून 2017), एस. एम. येलपले (6 मार्च 2016 ते 23 जून 2016), ए. एम. मोरे (29 जून 2017 ते आजअखेर) या तीन ग्रामसेवकांना निलंबित करण्यात आले आहे. 2015-15 मधील गौण खनिज निधीत अनियमितता करणे, दफ्तर पूर्ण न करणे, स्वतः:च्या नावे धनादेश काढून बेकायदा निधी वर्ग करणे यासह इतर कारणास्तव ही कारवाई करण्यात आली आहे. एकाच ग्रामपंचायतीच्या तीन तत्कालीन ग्रामसेवकांना एकाच कारणास्तव निलंबित करण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भारूड यांनी मंगळवारी जिल्ह्यातील तीन ग्रामसेवकांना निलंबित केल्यानंतर आज पुन्हा तीन ग्रामसेवकांना निलंबित केले आहे. 

Web Title: solapur news ZP school 18 teacher Suspended