जातीय सलोख्याने दुरावा कमी झाला- पोलिस आयुक्त तांबडे

परशुराम कोकणे
शुक्रवार, 4 मे 2018

सोलापूर : पोलिस आयुक्त तांबडे सोलापूरचा पदभार स्वीकारून आज शुक्रवारी एक वर्ष होत आहे. त्यानिमित्त सकाळने त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी बोलताना संवेदनशील असलेल्या सोलापुरात गेल्या वर्षभरात आपण कायदा सुव्यवस्थेला प्राधान्य दिल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कायदा सुव्यवस्था बिघडेल असा एकही प्रश्‍न निर्माण झाला नाही याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. जातीय सलोखा रहावा यासाठी आम्ही सण-उत्सवाच्या काळात विविध उपक्रम राबविले. जातीय सलोख्यामुळे जाती-धर्मातील दुरावा कमी झाला असून, सुसंवाद वाढला असल्याचेही त्यांनी म्हटले.

सोलापूर : पोलिस आयुक्त तांबडे सोलापूरचा पदभार स्वीकारून आज शुक्रवारी एक वर्ष होत आहे. त्यानिमित्त सकाळने त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी बोलताना संवेदनशील असलेल्या सोलापुरात गेल्या वर्षभरात आपण कायदा सुव्यवस्थेला प्राधान्य दिल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कायदा सुव्यवस्था बिघडेल असा एकही प्रश्‍न निर्माण झाला नाही याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. जातीय सलोखा रहावा यासाठी आम्ही सण-उत्सवाच्या काळात विविध उपक्रम राबविले. जातीय सलोख्यामुळे जाती-धर्मातील दुरावा कमी झाला असून, सुसंवाद वाढला असल्याचेही त्यांनी म्हटले. दर दहा वर्षांनी सोलापुरात तणाव निर्माण होतो असे ऐकले होते, मात्र आता तसे काही होणे शक्‍य नाही असा विश्‍वास पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांनी व्यक्त केला. 

रमजान ईद, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीमध्ये सर्वच जाती-धर्माच्या लोकांनी एकत्र येवून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. गेल्या वर्षभरात जाती-धर्माचा एकही वाद माझ्यापर्यंत आला नाही असे सांगून पोलिस आयुक्त तांबडे म्हणाले, जातीय तंटे कमी झाले. शांततेला गालबोट लागले नाही ही माझ्यासाठी मोठी उपलब्धी आहे. दरोड्यासारख्या मोठ्या घटना घडल्या नाहीत. खूनाचे गुन्हे उघडकीस आले. मंगळसूत्र चोरी, सोनसाखळी चोरीवर नियंत्रण आले आहे. 
शहर शांत रहावे यासाठी सोलापूरकरांसह पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याचे आयुक्त तांबडे यांनी सांगितले. 

हे केले वर्षभरात.. 

  • जातीय सलोख्यासह विविध उपक्रम
  • नऊ गुंडावर स्थानबद्धची कारवाई 
  • वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर ई चलन कारवाई 
  • सहा पोलिस ठाण्यांना मिळाले आयएसओ 
  • अधिकारी-कर्मचारी आणि त्यांच्या कुटूंबीयांसाठी कार्यक्रम 
  • अरविंद धाम पोलिस वसाहतीमध्ये अभ्यासिका 

पोलिस दलात सकारात्मक बदल व्हावेत यासाठी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या मदतीने उदिष्ट ठेवून काम केले. गेल्या वर्षभरात अनेक सकारात्मक बदल सोलापुरात झाले आहेत. जातीय सलोखा उपक्रमामुळे सर्वच जाती-धर्मात सुसंवाद वाढला आहे. अवैध धंद्याविरोधात सातत्याने कारवाई सुरु आहे. मंगळसूत्र चोरीच्या घटना कमी झाल्या आहेत. गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. 
- महादेव तांबडे, पोलिस आयुक्त

Web Title: solapur now has a communal harmony, the police commissioner Tamde