सोलापूर : आयुक्तांचे स्वीय सहायक सुनील क्षिरसागर यांचे अवयवदान

sunil-khirsagar
sunil-khirsagar

सोलापूर- सोलापूर महापालिका आयुक्त यांचे स्वीय सहायक सुनील क्षिरसागर यांच्या नातेवाईकांच्या परवानगीने किडनी, नेत्र आणि लिव्हरचे अवयदान करण्यात आले. मागील चार- पाच दिवसांपूर्वी ड्यूटी संपवून रात्री घरी जाताना मोटारसायकल अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर सोलापुरातील आश्विनी सहकारी रुग्णालयात उपचार सुरु होते. सोमवारी त्यांना ब्रेनडेड घोषित करण्यात आले. आयुक्त डॉ. ढाकणे यांनी अवयवदानासाठी नातेवाईकांना तयार केले. मृत क्षिरसागर यांना दोन मुली व एक मुलगा असून पत्नी घरकाम करतात.

मंगळवारी, सकाळी ११.३० वाजता क्षिरसागर यांचे दोन्ही डोळे सोलापुरातीलच तोष्णीवाल हॉस्पीटलला तर एक किडनी आश्विनी रूग्णालयातच ठेवण्यात आली आहे. तर एक किडनी आणि लिव्हर पुण्यातील सह्याद्री हॉस्पीटलला देण्यात आले. सकाळी साडेअकरा वाजता ते अवयव रुग्णवाहिकेद्वारे पुण्याला हलविण्यात आले. 

या मोहिमेत डॉ. किरण जोशी, डॉ. विठ्ठल कृष्णा, डॉ. हेमंत देशपांडे, डॉ. संजय गायकवाड, डॉ. अरुणकुमार, डॉ. अनुराधा कारंडे, स्वरूपा कौलगी, डॉ. शिवराम सरवदे, डॉ. दत्ता शिंदे, डॉ. अवधूत कुलकर्णी यांचा सहभाग होता. आश्विनी हॉस्पिटलचे अध्यक्ष सी.एस. स्वामी, उपाध्यक्ष विजय पाटील यांच्यासह डॉ. सत्येश्वर पाटील, डॉ. विश्वनाथ नेरकर आणि डॉ. राजेंद्र घुली यांनीही प्रमुख भूमिका बजावली.

सोलापूरात आता अवयवदानाची चळवळ वाढू लागली असून त्याद्वारे अनेकांना जिवनदान तर अनेकांना दृष्टी मिळाली आहे. मागील वर्षभरात सोलापुरातील यशोधरा हॉस्पिटल मध्ये आठ, आश्विनी रुग्णालयात चार तर सिव्हिल रुग्णालयात तीन रुग्णांनी अवयवदान केले आहे. कदाचित अवयदानात सोलापूर राज्यात अव्वल असेल.
- डॉ. सुनील घाटे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com