डिजीटल पेमेंटचा 'सोलापूर पॅटर्न' राष्ट्रीय पातळीवर

digital payment
digital payment

सोलापूर- महापालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरु असलेली "डिजीटल व्यवहार करा; सन्मानास पात्र व्हा'' या योजनेची दखल केंद्र शासनाने घेतली आहे. दरम्यान, "डिजीटल व्यवहारा'चा प्रचार व प्रसार करण्यासाठी "डिजीटल दूत' संकल्पना राबविणार असल्याचे मुख्य लेखापाल शिरीष धनवे यांनी आज (मंगळवार) ' सकाळ'ला सांगितले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील "डिजीटल पेमेंट'ची प्रत्यक्षातील कार्यवाही सोलापूर महापालिकेने सुरु करून, सातत्याने प्रगती करत देशात 18 वे मानांकन मिळवले आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत प्रत्येक शासकीय कार्यालय डिजीटल झाले पाहिजे, अशा सक्त सूचना पंतप्रधान कार्यालयाने दिल्या आहेत. त्यासाठी 1 जुलै ते 31 ऑक्‍टोबर हा कालावधी निश्‍चित करण्यात आला आहे. स्मार्ट सिटी कार्यालयातील व्यवहार शंभर टक्के डिजीटल करण्यात आले आहेत. 

डिजीटल पेमेंटमध्ये सहभाग वाढविण्यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन पुरस्कारांची घोषणा केली आहे. डिजीटल पेमेंट पद्धतीने जास्तीत जास्त व्यवहार करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा व अधिकाऱ्यांचा सन्मान होणार आहे, ही संकल्पना केंद्रीय नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी उचलून धरली आहे. त्याबाबत निर्णय झाला तर "सोलापूरचा डिजीटल पॅटर्न' देशभर लागू होऊ शकतो. 

डिजीटल पेमेंटमध्ये सोलापूर महापालिका अग्रस्थानी नेण्याची चांगली संधी मिळाली आहे. बॅंकेत पैसे भरणे, काढणे, मिळकत कर, वीज बिल, टेलिफोन बील, मोबाईल बिल, रिचार्ज, पेट्रोल तसेच दैनंदिन खरेदी ऑनलाईन केल्यास सोलापूर पॅटर्न देशभर लागू होईल. 
- शिरीष धनवे, मुख्य लेखापाल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com