'खासदार बनसोडेंना नाचायला वेळ, सांत्वन करायला नाही'

'खासदार बनसोडेंना नाचायला वेळ, सांत्वन करायला नाही'

ब्रह्मपुरी (ब्रह्मपुरी) : माचणुर (ता. मंगळवेढा) येथील एवढी मोठी घटना घडून प्रतीक शिवशरण हत्याप्रकरणाला 14 दिवसाचा कालावधी उलटूनही या सोलापुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शरद बनसोडे यांना नाचायला वेळ मिळाला, पण शोकाकूल शिवशरण कुटुंबाच्या सांत्वनाला वेळ मिळाला नाही. त्यामुळे तालुकावासियांतून संताप व्यक्त केला जात आहे.

खासदार बनसोडे कार्यक्रमाच्या निमित्ताने मंगळवेढा शहरातील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयामध्ये दुपारी 'उनाड मस्ती' या चित्रापटाचे ट्रेलर व पोस्टरचे उद्घाटन केले. जवळच हाकेच्या अंतरावर असलेल्या जनहित शेतकरी संघटनेच्या उपोषणास पाठ फिरवुन बघत गेले. त्यांनी तालुक्यातील विविध विकास कामाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यानंतर दुपारी एका स्थानिक निर्मात्याने तयार केलेल्या चित्रपटाच्या लॉन्चिंग कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

या कार्यक्रमाच्या समारोपानंतर या चित्रपटातील गाण्यावर कलाकारांसमवेत त्यांचेही पाय थिरकले. त्यामुळे त्यांच्यातील अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळाला असला तरी एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी शिवशरण कुटुंबाच्या नातेवाईकांची भेट घेऊन सांत्वन करण्याबरोबर पोलिस तपासाला आढावा घेऊन कुटुंबियांना धीर देणे आवश्यक होते. परंतु दुर्देवाने ते झाले नाही, याच मार्गावरुन घटनास्थळी सुसाट न थांबता सोलापुर गाठले. माचणुर हे आपल्या मतदार संघातील असून मंगळवेढा तालुक्याने या मतदार संघात जनतेने मताधिक्य दिले. परंतू त्यांना जाणीवही झाली नाही व विसर पडला. यामुळे या समाजाला बनसोडे विषयी तीव्र नाराजी झाली आहे. तर माझी खासदार सुशीलकुमार शिंदे,सहकार मंत्री सुभाष देशमुख हे देखील स्थानिक कार्यकर्ते सूचनेनुसार वारंवार मंगळवेढ्याला येत असतात. पण या घटनेकडे ही त्यांनाही वेळ मिळाला नाही हे दुर्दैव आहे. येत्या सहा महिन्यात ते मतासाठी हजार वेळा चकरा मारतील पण सर्वसामान्य मतदानाच्या अडचणीसाठी मात्र वेळ काढत नाहीत हे या घटनेवरून दिसून येते.

"आमच्या प्रतीकचे अपहरण होऊन हत्या करण्यात आली व दोन आठवड्याचा कालावधी उलटूनही मारेकरी अजूनही मोकाट आहेत. आम्ही शिवशरण कुटुंब दुःखात असून खासदार शरद बनसोडे साहेबांना आमच्या मतदार संघाचा विसर पडलेला आहे"
- जनार्धन शिवशरण, मृत प्रतीकचे चुलते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com