सोलापुरात काँग्रेस, राष्ट्रवादीला खिंडार?; 4 मोठे नेते भाजपच्या वाटेवर

वृत्तसंस्था
गुरुवार, 18 जुलै 2019

लोकसभा निवडवणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांना भाजपमध्ये प्रवेश केला होता. विजयसिंह मोहिते पाटील यांनी स्वत: भाजपमध्ये प्रवेश केला नसला तरीही लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्याच उमेदवाराच्या बाजूने स्वत:ची ताकद उभी केली होती.

सोलापूर : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी सोलापूर जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला खिंडार पडण्याची शक्यता आहे. या दोन्ही पक्षाचे चार प्रमुख नेते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. लवकरच हे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. 

लोकसभा निवडवणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांना भाजपमध्ये प्रवेश केला होता. विजयसिंह मोहिते पाटील यांनी स्वत: भाजपमध्ये प्रवेश केला नसला तरीही लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्याच उमेदवाराच्या बाजूने स्वत:ची ताकद उभी केली होती. त्यामुळे काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले आणि उमेदवारी मिळालेले रणजितसिंह निंबाळकर यांनी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात विजय मिळविला होता. 

आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्ह्यातील चार नेते शिवसेना-भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. माढ्याचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे हे भाजपमध्ये जाण्यास इच्छूक असल्याचे बोलले जात आहे. त्याबरोबरच अक्कलकोटचे काँग्रेसचे आमदार सिध्दाराम म्हेत्रे, पंढरपूरचे काँग्रेसचे आमदार भारत भालके आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळ विधानसभेचे आमदार रमेश कदम यांची नावे चर्चेत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur prominent Congress NCP leaders may be joins BJP