डिजिटल पेमेंटमध्ये सोलापूर देशात सोळावे 

विजयकुमार सोनवणे
गुरुवार, 4 ऑक्टोबर 2018

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील "डिजीटल पेमेंट'ची प्रत्यक्षातील कार्यवाही सोलापूर महापालिकेने सुरु करून, सातत्याने प्रगती करत देशात 16 वे मानांकन मिळवले आहे. तिसऱ्या घोषणेत हा क्रमांक 18 होता. नव्या मानांकनाची घोषणा आज (ता. 4) काही वेळापूर्वी झाली, अशी माहिती एमएस तज्ज्ञ तथा नोडल ऑफिसर नागनाथ पदमगोंडा यांनी "सकाळ'ला दिली. 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील "डिजीटल पेमेंट'ची प्रत्यक्षातील कार्यवाही सोलापूर महापालिकेने सुरु करून, सातत्याने प्रगती करत देशात 16 वे मानांकन मिळवले आहे. तिसऱ्या घोषणेत हा क्रमांक 18 होता. नव्या मानांकनाची घोषणा आज (ता. 4) काही वेळापूर्वी झाली, अशी माहिती एमएस तज्ज्ञ तथा नोडल ऑफिसर नागनाथ पदमगोंडा यांनी "सकाळ'ला दिली. 

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत प्रत्येक शासकीय कार्यालय डिजीटल झाले पाहिजे, अशा सक्त सूचना पंतप्रधान कार्यालयाने दिल्या आहेत. त्यासाठी 1 जुलै ते 31 ऑक्‍टोबर हा कालावधी निश्‍चित करण्यात आला आहे. त्यादृष्टीने महापालिकेने पहिले पाऊल टाकले आहे. तसेच स्मार्ट सिटी कार्यालयातील व्यवहार शंभर टक्के डिजीटल करण्यात आले आहेत. दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी होते की नाही याचा दर महिन्याचा अहवाल पंतप्रधान कार्यालयाला पाठविला जात आहे. 

डिजीटल पेमेंटमध्ये सहभाग वाढविण्यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. महापालिकेतील सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांचे वेतन ऑनलाईन पद्धतीने केले जाते. त्यासाठी संबंधित बॅंकेने सर्वांना एटीएम व डेबीट कार्ड उपलब्ध करून दिले आहे. तसेच जवळपास सर्वच व्यापाऱ्यांकडून स्वाईप कार्ड स्वीकारण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेतील सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांनी आपले सर्व आर्थिक व्यवहार रोखीने, धनादेश किंवा डीडीद्वारे न करता ऑनलाईन डिजीटल पद्धतीने करावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. जे अधिकारी व कर्मचारी आपले आर्थिक व्यवहार 1 ऑगस्ट ते 31 ऑक्‍टोबर या कालावधीत जास्तीत जास्त डिजीटल पेमेंट पद्धतीने करतील त्या कर्मचाऱ्यांचा व अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच बक्षिस देऊन गौरविण्यातही येणार आहे. 

राज्यातही पदोन्नती; तिसरे मानांकन 
सोलापूर महापालिकेने राष्ट्रीय स्तरावर 16 वे स्थान पटकावतानाच राज्यातही नाशिकला मागे सारून तिसऱ्या स्थानावर उडी मारली आहे. पिंपरी चिंचवड प्रथम क्रमांकावर असून, पुणे द्वितीय तर सोलापूर तृतीय क्रमांकावर आहे. दुसऱ्या फेरीत डिजीटल पेमेंटमध्ये सोलापूर महापालिका अग्रस्थानी नेण्याची चांगली संधी मिळणार आहे. बॅंकेत पैसे भरणे, काढणे, मिळकत कर, वीज बिल, टेलिफोन बील, मोबाईल बिल, रिचार्ज, पेट्रोल तसेच दैनंदिन खरेदी ऑनलाईन करता येणार आहे.

Web Title: solapur ranked 16 in digital payment in whole country