सोलापूर ग्रामीणची वाढली चिंता ! 192 पॉझिटिव्ह अन्‌ सात जणांचा झाला मृत्यू 

तात्या लांडगे
Wednesday, 29 July 2020

ठळक बाबी... 

  • जिल्ह्यातील 25 हजार 126 व्यक्‍तींची झाली कोरोना टेस्ट 
  • आतापर्यंत तालुक्‍यांमध्ये सापडले तीन हजार 312 पॉझिटिव्ह 
  • जिल्ह्यातील मृतांची संख्या आता 96; दररोज वाढताहेत मृत्यू 
  • आतापर्यंत एक हजार 818 रुग्णांची कोरोनावर मात; एक हजार 398 रुग्णांवर उपचार 

सोलापूर : जिल्ह्यातील 11 तालुक्‍यांमधील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. तर मृतांची संख्याही दररोज वाढतच आहे. बुधवारी (ता. 29) जिल्ह्यात नव्याने 192 रुग्णांची भर पडली असून दुसरीकडे पुन्हा एकदा सात रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

 

अक्‍कलकोटमधील स्वामी समर्थ नगरात एक तर दुधनीत दोन रुग्ण आढळले आहेत. करमाळ्यातील अळसुंदे व जेऊर येथे प्रत्येकी एक रुग्ण, माढ्यातील अकोले बु. येथे एक, लऊळ, मोडनिंब येथे प्रत्येकी दोन, रिधोऱ्यात तीन, पापनसमध्ये तब्बल 14 रुग्ण सापडले आहेत. माळशिरस तालुक्‍यातील अकलूज येथे सात, बोरगाव, फळवनी, धर्मपुरी, माळीनगर, माळशिरसमध्ये प्रत्येकी एक, लवंग येथे तीन, श्रीपूर चार तर वाफेगावात दोन रुग्ण सापडले आहेत. मंगळवेढ्यातील सिव्हिल कोर्ट, दामाजी नगर, सब जेल येथे प्रत्येकी एक, पोलिस स्टेशन सहा, आंधळगाव व मरवडे येथे प्रत्येकी तीन रुग्णांची भर पडली आहे. मोहोळ तालुक्‍यातील आष्टेत दोन, कामती खु., कोरवली, वाघोली, यावलीत प्रत्येक एक रुग्ण आढळला आहे. बीबी दारफळ, राळेरासमध्ये प्रत्येकी एक, कोंडीत तीन, पंढरपुरातील बंकटस्वामी मठ परिसरात सहा, डाळे गल्ली, मनिषा नगर, महाद्वार शॉपिंग सेंटर, काळा मारुती मंदिराजवळ, सावता माळी मंदिराजवळ दोन, पद्मावती झोपडपट्टी, कालिका देवी चौक, तानाजी चौक, तिरंगा नगर, गोविंदपुरा, इंदिरा गांधी मार्केट, फुलचिंचोली, करोळे, लक्ष्मी टाकळी येथे प्रत्येकी एक, गांधी रोड, शितल शहा हॉस्पिटलजवळ, परदेशी नगर, संत पेठ येथे प्रत्येकी दोन, घोंगडे गल्लीत पाच, जुनी पेठेत चार, कदबे गल्लीत तीन, रामबाग रोड परिसरात तब्बल 21, झेंडे गल्लीत सहा रुग्ण सापडले आहेत. सांगोल्यातील राऊत मळा, बागलवाडी, संगेवाडी येथे प्रत्येकी एक, सब जेल येथे 16, महदू येथे चार, सोनलवाडीत दोन आणि दक्षिण सोलापुरातील औज येथे दोन, बोरामणी, कुरघोट, मनगुळी, मुस्ती येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. बार्शीतील भवानी पेठ, घोडके प्लॉट, मांगाडे चाळ, मंगळवार पेठ, मनगिरे मळा, टिळक चौक, रातंजण, उपळे दुमाला येथे प्रत्येकी एक, डाणे गल्ली, सुभाष नगर व वैराग येथे प्रत्येकी दोन, सन्मित्र हौसिंग सोसायटीत चार रुग्ण नव्याने आढळले आहेत. 

'या' गावातील रुग्णांचा मृत्यू 
अक्‍कलकोट तालुक्‍यातील सुलेरजवळगे येथील 72 वर्षीय महिलेचा, देशमुख गल्लीतील 93 वर्षीय पुरुषाचा, विठ्ठल मंदिराजवळील 45 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. तसेच माढ्यातील उपळाई येथील 82 वर्षीय पुरुषाचा, पंढरपूर तालुक्‍यातील सरकोलीतील 52 वर्षीय पुरुषाचा, पंढरपुरातील कदबे गल्लीतील 70 वर्षीय महिलेचा, तर उत्तर सोलापुरातील बीबी दारफळ येथील 42 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur Rural increas the tension 192 positive and seven death