सोलापूरला १८ पासून तीन दिवसांआड पाणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 ऑगस्ट 2016

सोलापूर - वीर धरणातून सोडलेले पाणी औज बंधाऱ्यात दाखल झाले असून, ४.६० मीटर एवढा पाणीसाठा झाला आहे. हिप्परगा जलाशयातही चांगला पाणीसाठा झालेला आहे. असे असूनही सोलापूर शहराला होणारा चार दिवसांआडचा पाणीपुरवठा तीन दिवसांआड करण्यासाठी महापालिका प्रशासनास मुहूर्त मिळत नव्हता. मात्र, त्यावर आज (सोमवारी) संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीत चर्चा झाली असून १८ ऑगस्टपासून शहरास तीन दिवसांआड पाणीपुरवठा 

करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चर्चेबाबतची ही माहिती सार्वजनिक आरोग्य अभियंता एम. एस. वाघमारे यांनी दिली. 

उपमहापौर प्रवीण डोंगरे यांच्या कक्षात त्यांच्या उपस्थितीत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक पार पडली. बुधवारपासून टाकळी पंपगृहातील चौथा पंप चालू करण्यात येणार आहे. जुळे सोलापूर येथील पंपगृहातून ११ पाण्याच्या टाक्‍या पूर्ण क्षमतेने भरून घेण्यात येणार आहेत. सध्या ११ पैकी पाच टाक्‍याच भरून घेतल्या जात आहेत. टाकळीचा चौथा पंप चालू केल्याने २० एमएलडी पाणी वाढ होणार आहे. हिप्परगा तलावही चांगला भरला असून तेथूनही चार-पाच एमएलडी पाणी उपलब्ध होणार आहे. 

शहरातील १० लाख ३० हजार लोकांना रोज १०३ एमएलडी पाणी लागते. परंतु आता पूर्ण क्षमतेने पाण्याचा उपसा केल्याने त्यात वाढ होऊन १२८ एमएलडी पाण्याचा उपसा होणार असल्याचे उपमहापौर प्रवीण डोंगरे यांनी सांगितले. उजनी पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर तेच पाणी कॅनॉलद्वारे सोडून कारंबा येथील उपपंपगृहातून हिप्परगा धरणात टाकून हिप्परगा तलाव भरून घेण्याच्या सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या असल्याचे श्री. डोंगरे यांनी सांगितले. पुढे जाऊन शहराचा पाणीपुरवठा दोन दिवसांआड कसा करता येईल, याबाबतही नियोजन करण्यात येणार असल्याचे उपमहापौर प्रवीण डोंगरे यांनी सांगितले.

उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा

उजनी पंपगृहास होणारा विद्युतपुरवठा सोमवारी दुपारपासून खंडित झाल्यामुळे पुरेशा प्रमाणात पाणी उपसा होऊ शकला नाही. त्यामुळे सोमवारचा (ता. ८) उर्वरित पाणीपुरवठा मंगळवारी (ता. ९) करण्यात येणार आहे. मंगळवार (ता. ९) आणि बुधवारी (ता. १०) पाणीपुरवठा उशिरा आणि कमी दाबाने होणार आहे. नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Solapur three days behind the water from 18