शेकडो सायकलस्वारांनी केला पर्यावरण संवर्धनाचा जागर 

Solapur to Tuljapur cycle rally for environment cause
Solapur to Tuljapur cycle rally for environment cause

सोलापूर : पर्यावरण संवर्धन, इंधन बचत, पावसाच्या पाण्याचे संकलन, रस्ता सुरक्षा या विषयावर जनजागृती करत रविवारी सोलापूर ते तुळजापूर मार्गावर सायकल रॅली काढण्यात आली. विविध क्षेत्रातील शेकडो सोलापूरकरांनी या सायकल रॅलीत उत्साहाने सहभाग नोंदविला. 

जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे सदस्य प्रा. सारंग तारे यांच्या संकल्पनेतून 30 व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहनिमित्त इको फ्रेंडली क्‍लबच्यातीने सीएनएस हॉस्पिटल, प्रादेशिक परिवहन कार्यालय, ग्रामीण पोलिस दल, राज्य राखीव पोलिस बल, हिंदुस्थान पेट्रोलियम यांच्या सहकार्याने ही सायकल रॅली काढण्यात आली आहे. रविवारी सकाळी 6:30 वाजता सोलापुरातील सीएनएस हॉस्पिटल येथून सायकल रॅलीचा शुभारंभ झाला.

पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी हिरवा झेंडा दाखविला. पोलिस अधीक्षक पाटील यांनी काही अंतर सायकलिंग करून सहभागी सदस्यांचा उत्साह वाढविला. सीएनएस रुग्णालयाचे चेअरमन डॉ. प्रसन्न कासेगावकर, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण सावंत, सुरक्षा शाखेचे पोलिस निरिक्षक संतोष काणे, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक विजयानंद पाटील, संयोजक प्रा. तारे, भाऊराव भोसले, अमेय केत, डॉ. अरुंधती हराळकर, प्रेक्षिता चपळगावकर, राजश्री कनके, अनुजा तारे, संदीप पाटील, शिवराम सरवदे, श्रद्धा सक्करगी, भावेश शहा, बाहुबली शहा, स्वाधीन गांधी, गणेश शिलेदार, अमेय केत, मित्तल पटेल, सुनील थिटे, संजीवकुमार कलशेट्टी, रजनीकांत जाधव, प्रकाश आळंगे, वंदना आळंगे, वेदांत गनमोटे यांच्यासह शेकडो सोलापूरकर सायकल रॅलीत सहभागी झाले होते. 

सकाळी साडेदहा वाजता ही सायकल रॅली तुळजापूर येथे पोचली. मान्यवरांनी रॅलीतील सहभागी सदस्यांचे स्वागत केले. 

सायकल रॅलीत सहभागी होवून खूपच छान वाटले. वातावरण उत्साहपूर्ण होते. सर्वांनी शिस्तीमध्ये रॅली पूर्ण केली. स्मार्ट सिटीच्या दिशेने जाणाऱ्या सोलापुरात अशा उपक्रमांची आवश्‍यकता आहे. 
- संगीता जोशी, सहभागी सदस्य 

सायकल रॅलीच्या माध्यमातून रस्ता सुरक्षा आणि पर्यावरण संवर्धनाबद्दल जनजागृती करण्यात आली. विद्यार्थी आणि महिलांचाही सहभाग लक्षणीय होता. मित्रांच्या सोबतीने ही रॅली अधिक आनंददायी झाली. 
- स्वाधीन गांधी, सहभागी सदस्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com