उजनीच्या प्रदुषणावर सोलापूर विद्यापीठाचा पुढाकार 

तात्या लांडगे
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायनी ठरलेल्या उजनी धरणाला प्रदुषणमुक्‍त करण्याकरिता सोलापूर विद्यापीठातील रसायनशास्त्र व अर्थशास्त्र विभागाचे विद्यार्थी त्याबाबत लवकरच संशोधन करतील, अशी माहिती विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी सकाळशी बोलताना दिली. 

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायनी ठरलेल्या उजनी धरणाला प्रदुषणमुक्‍त करण्याकरिता सोलापूर विद्यापीठातील रसायनशास्त्र व अर्थशास्त्र विभागाचे विद्यार्थी त्याबाबत लवकरच संशोधन करतील, अशी माहिती विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी सकाळशी बोलताना दिली. 

खडकवासला, लोणावळासह भिमाशंकर याठिकाणाहून उजनी धरणात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पाणी जमा होते. दरम्यान पुणे जिल्ह्यातील कारखाने तसेच अन्य उद्योगधंद्यातून बाहेर पडणारे प्रदुषित पाणी धरणात येते. संपूर्ण सोलापूर शहराला उजनी धरणातील पाणी पिण्यासाठी वापरले जाते. तसेच शेतीसह जनावरांसाठीही उजनी धरणातून दरवर्षी वेळोवेळी पाणी सोडण्यात येते. धरणातील पाणी प्रदुषणयुक्‍त असल्याने नागरिकांसह, जनावरे व शेतीला धोका निर्माण होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे आता त्यावर कायमस्वरुपीचा तोडगा काढण्याकरिता विद्यापीठ पुढाकार घेणार आहे. विद्यार्थ्यांनी केलेल संशोधन शासनाकडे पाठविण्यात येईल आणि त्यानंतर शासनस्तरावरुन उपाययोजना केल्या जातील, असे विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे आगामी काळात उजनी धरण प्रदुषणमुक्‍त होण्याची आशा निर्माण झाली आहे. 

सोलापूर, पुणे, अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणात सध्या मोठ्या प्रमाणावर गाळ आहे. तसेच पुण्यासह अन्य ठिकाणाहून उजनी धरणात येणारे पाणी प्रदुषणयुक्‍त असते. सोलापूर शहराला त्याठिकाणाहून पाणीपुरवठा होतो. त्यामुळे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी केलेल संशोधन त्यावर नक्‍कीच उपाय ठरेल. 
- डॉ. मृणालिनी फडणवीस, कुलगुरु 

उजनी धरणाची सद्यस्थिती 
पाणी साठवण क्षमता -123 टिएमसी 
धरणातील गाळ - 15.70 टिएमसी 
धरणाचे पाणलोट क्षेत्र - 14,827 चौ.कि.मी

Web Title: solapur university initiate for ujani pollution