'सोलापूर विद्यापीठ नामांतराबाबत न्यायालयाचा निर्णय मान्य करणार'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 मार्च 2018

सोलापुरातील शासकीय विश्रामधाममध्ये आयोजिलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. इरेश स्वामी, सिद्धेश्‍वर कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी, माजी आमदार विश्‍वनाथ चाकोते, वीरभद्रेश बसवंती यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. 

सोलापूर : सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराबाबत उच्च न्यायालय जो निर्णय देईल तो मान्य असेल असे वीरशैव शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी सांगितले. स्वतंत्र लिंगायत धर्म संघटनेला मान्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

सोलापुरातील शासकीय विश्रामधाममध्ये आयोजिलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. इरेश स्वामी, सिद्धेश्‍वर कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी, माजी आमदार विश्‍वनाथ चाकोते, वीरभद्रेश बसवंती यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. 

प्रा. धोंडे म्हणाले,""नामांतराबाबत शासनाने जी समिती नियुक्त केली आहे, त्यामध्ये धनगर समाजाचे दोन मंत्री आहेत. त्यांनी राजीनाम्याची धमकी देऊन मुख्यमंत्र्यांवर दबाव आणला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नागपूर येथील मेळाव्यात सोलापूर विद्यापीठाला राजमाता अहल्यादेवी होळकर यांचे नाव दिल्याची घोषणा केली. त्याचा शिवा संघटनेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला तसेच राज्यातील विविध गावात बंदही पाळण्यात आले. सध्या ही बाब न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे न्यायालय जो निर्णय तो आम्हाला मान्य असणार आहे.'' 

कर्नाटक राज्य सरकाराने स्वतंत्र लिंगायत धर्माबाबत जी घोषणा केली आहे, ती पूर्णपणे राजकीय हेतून केली आहे. हा निर्णय जाहीर करून त्यांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला आहे. येडीयुराप्पांची मते कमी करण्याच्या नादात घेतलेल्या या निर्णयाचा फटका त्यांना बसणार असून, या एकाच कारणामुळे कर्नाटकमधील कॉंग्रेसचे सरकार कोसळेल, असा दावाही प्रा. धोंडे यांनी केला. 

Web Title: Solapur university name change contravercy