सोलापूर विद्यापीठाचा बुधवारी विशेष दीक्षान्त समारंभ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 एप्रिल 2017

सोलापूर - सोलापूर विद्यापीठाकडून विशेष दीक्षान्त समारंभाची जय्यत तयारी सुरू आहे. राज्यपाल तथा कुलपती विद्यासागर राव यांच्या हस्ते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना डी.लिट. ही मानद पदवी प्रदान करण्यात येणार आहे. हा सोहळा बुधवारी (ता. 26) सोलापूर विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात होणार आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या कार्यक्रमासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी 20 समित्या स्थापण करण्यात आल्या आहेत. सभागृहाशेजारी शामियाना उभारण्यात येणार आहे. सोलापूर विद्यापीठाने डिजिटल पदवी प्रमाणपत्र देण्यास; तसेच त्यावर आईच्या नावाची नोंद करण्यास मागील वर्षापासून सुरवात केली आहे. सुशीलकुमार शिंदे यांना देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रावरही आधार कार्ड क्रमांकाची नोंद असणार आहे. याबाबतीत महाराष्ट्रात सर्वप्रथम कार्यवाही करण्यात सोलापूर विद्यापीठाने आघाडी घेतली आहे.

Web Title: solapur university special dikshant programe