मोदी सरकारने केला देशद्रोह; युवक काँग्रेसचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 मे 2018

सोलापूर :  पाकिस्तानकडून साखर आयात करून मोदी सरकारने भारतातील शेतकऱ्यांना संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत सोलापूर लोकसभा युवक काँग्रेस वतीने आज निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी सुदीप चाकोते, राहुल वर्धा, प्रवीण जाधव, सोहेल शेख, तिरुपती परकीपंडला, समाधान व्होटकर, गुलाब नारायनकर, जाकीर शेख उपस्थित होते.

चाकोते म्हणाले, "भारतात साखरेचे विक्रमी उत्पादन झाले. साखरेला भाव नाही म्हणून कारखाने अडचणीत आहेत. हमी भावासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन झाले आहेत. पण मोदी सरकारने  मात्र पाकिस्तानकडून प्रचंड प्रमाणात साखर आयात केली आहे. त्यामुळे साखरेचे भाव पडणार असून शेतकरी आणि कारखाने अडचणीत येणार आहेत."

"शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्येस प्रवृत्त होणार आहेत. एकीकडे सीमेवरती पाकिस्तान आपल्या जवानांवर गोळ्या घालून ठार मारत आहेत. आणि मोदी सरकार त्याच पाकिस्तान कडून साखर घेते आहे. विरोधात असताना मोदींनी मोठमोठ्ठया गप्पा मारल्या छपन्न उंची छाती, एक सर के बदले दस सर म्हणणारे मोदी सरकार आज पाकिस्तानातून साखरेचे पोते आणत आहेत आणि पाकिस्तानला लव्हलेटर लिहीत आहेत. शरीफ च्या आईला साडी चोळी आहेर करून, साखर आयात करून मेक इन इंडिया ऐवजी मेक इन पाकिस्तानच्या व्यापाराला प्रोत्साहन देत आहेत. साखर उद्योग, भारतीय शेतकरी अडचणीत असताना,  साखर आयात करून पाकिस्तानला फायदा करून देणे म्हणजे मोदी सरकारने या देशाशी केलेला देशद्रोहच आहे. साखर आयात बंद न केल्यास सोलापूर लोकसभा युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, " असेही चाकोते म्हणाले.

Web Title: Solapur youth congress attacks Modi Government over Pakistani sugar