सोलापूर : रिक्षातून शाळकरी मुलांच्या वाहतुकीला बंदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रिक्षातून

सोलापूर : रिक्षातून शाळकरी मुलांच्या वाहतुकीला बंदी

सोलापूर : शहरात पाचशेहून अधिक शाळा व महाविद्यालये आहेत. स्कूल बस परवडत नसल्याने अनेक पालक त्यांच्या मुलांना रिक्षातून शाळेत पाठवतात. रिक्षातून क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक होते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे रिक्षा चालकांनी शाळकरी मुलांची वाहतूक करू नये, अन्यथा दंडात्मक कारवाई किंवा रिक्षा जप्त होईल, असा इशारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) दिला आहे.

शहरातील नामांकित शाळांचे शैक्षणिक शुल्क परवडत नाहीत, तसेच स्कूल बसचे भाडेही परवडत नाही. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील पालकांची मुले दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतात. परवडेल अशा दरात त्यांच्या परिसरातील रिक्षांतून आपल्या मुलांना शाळेत पाठवितात. पण, रिक्षांमध्ये सुरक्षिततेच्या अनुषंगाने कोणत्याही उपाययोजना केलेल्या नसतात. तर दुसरीकडे, एकाच रिक्षामध्ये क्षमतेपेक्षा दुप्पट-तिप्पट मुलांची वाहतूक केली जाते. त्यामुळे आता रिक्षांतून शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक होऊ नये याकडे आरटीओचे विशेष लक्ष असणार आहे. तसेच शाळांनाही त्याबाबत आता खबरदारी घ्यावी लागणार आहे.

जीव मुठीत धरून ओलांडावा लागतोय रस्ता

शहरातील अनेक शाळा रस्त्यालगत आहेत. स्कूल बसमधून न येणारी शाळकरी मुले विशेषत: पहिली ते चौथीतील मुले शाळेजवळील रस्ता जीव मुठी धरून ओलांडतात. त्या परिसरात वाहनचालकांना ‘शाळा आहे’ हा संदेश देणारा कुठेही फलक दिसत नाही. हा विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास यंदा तरी थांबेल, असा विश्वास पालकांना आहे. पण, शहर वाहतूक शाखा व महापालिका याकडे किती गांभीर्याने पाहील, याकडे लक्ष लागले आहे.

दोन दिवसांनी शाळा सुरू होत आहेत. स्कूल बसचालकांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे. कोणत्याही रिक्षा चालकाला शाळकरी मुलांनाची वाहतूक करता येणार नाही. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षांवर कडक कारवाई केली जाईल.

- विजय तिराणकर,सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर

शहरातील स्कूल बस ५२५

शहरातील एकूण रिक्षा १५,८५४

स्कूल बसमधून शाळेला जाणारी मुले १८,०००

Web Title: सोलापूर रिक्षातून शाळकरी मुलांच्या वाहतुकीला

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top