Samadhan Autade
Samadhan Autadesakal

आंधळगाव व इतर १० गावांच्या पाणीपुरवठा योजनेसाठी १० कोटी; समाधान आवताडे

पाणी पुरवठा सुरू करण्यासाठी जल मिशन कृती आराखड्यामध्ये १० कोटी रुपये निधी

मंगळवेढा : सध्या बंद असलेल्या तालुक्यातील आंधळगाव व इतर 10 गावांच्या प्रादेशिक नळ पाणी पुरवठा सुरू करण्यासाठी जल मिशन कृती आराखड्यामध्ये १० कोटी रुपये निधी तरतूद आ. समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून झाली. याबाबतचे पत्र नुकतेच प्राप्त झाले.

तालुक्यामध्ये भोसे,नंदूर,आंधळगाव या तिन्ही प्रादेशिक पाणी योजना बंद असून या सुरू करण्याच्या दृष्टीने आ. समाधान आवताडे यांनी पाठपुरावा सुरू केला असून सर्वप्रथम त्यांनी आंधळगाव व इतर 10 गावांच्या प्रादेशिक नळ पुरवठा योजना 1998 साली मंजूर होऊन 2006 मध्ये कार्यान्वित झाली. सदर योजनेस 15 वर्षे झाली पंप व भिमा नदीवरून प्लॅटकडे येणारी पाईप लाईन व पाणी पंप खराब झाले,2021 च्या हिवाळी अधिवेशनामध्ये आ. समाधान आवताडे यांनी या योजनेसाठी सरकारचे लक्ष वेधून घेत या योजनेचे पुनरुज्जीवन करण्याची आवश्यकता आहे.

या योजनेमध्ये लक्ष्मी दहिवडी, आंधळगाव,कचरेवाडी, अकोला, मारापूर, घरनिकी, महमदाबाद (शे),मल्लेवाडी, देगांव, ढवळस आणि धर्मगांव व निम शहरी असणारी संत चोखामेळानगर व संत दामाजीनगर ही गावे समाविष्ट आहेत. या योजनेच्या दुरुस्तीसाठी सदर आंधळगाव व इतर 10 गावांचे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा जल जीवन मिशन अंतर्गत योजनेमध्ये दरसूचीनुसार 10 कोटीचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले.निधी तरतूद करण्याचे आदेश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित विभागाला दिले.या भागातील गावांच्या पाण्याची समस्या लक्षात घेऊन आ. समाधान आवताडे यांच्या पाठपुराव्याची व या योजनेबद्दल केलेल्या अथक प्रयत्नांची दखल घेऊन या योजनेस निधी तरतूद केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com