
Career in Armed Forces : सैन्यदलात करिअर करण्यासाठी १५० मार्ग
सोलापूर : दहावी-बारावीनंतर इंजिनिअरिंग किंवा डॉक्टर होण्यासाठी युवक-युवतींची धडपड असते. यापलीकडे जाऊन करिअरचा शोध घेण्यात आजचा युवक वर्ग कमी पडतोय. सैन्यदलात एक-दोन नव्हे तर करिअर करण्याचे तब्बल १५० मार्ग आहेत.
त्यासाठी प्रामुख्याने वय, वेळ आणि शिस्तबद्धता या तीन गोष्टी फार महत्त्वाचे आहेत. नव्या युवकांना करिअरसंबंधी नवी दिशा देण्यासाठी कॅप्टन आशा शिंदे-अलगप्पा यांनी ज्ञानदर्शनी हेल्पलाइन सुरू केली आहे.
कॅप्टन आशा शिंदे या मागील ३० वर्षांपासून हजारो विद्यार्थ्यांना सैन्यदलात भरतीसाठी मार्गदर्शन करीत आहेत. आजोबा, वडील देशसेवेत असल्याने त्यांच्यातून प्रेरणा घेऊन १९९२ च्या पहिल्या महिला बॅचमधील त्या अधिकारी आहेत. तीन पिढ्या देशसेवा करत असताना इतरांनीदेखील देशसेवेत यावे यासाठी त्यांनी युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी ते काम करतात.
आतापर्यंत त्यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनाने ३७४ हून अधिक विद्यार्थी अधिकारी होऊन देशसेवा करीत आहेत. आजकाल युवक-युवती या दहावी, बारावी इंजिनिअरिंग किंवा डॉक्टर आणि पदवीनंतर एखाद्या कंपनीत काम करणे एवढंच झापड लावून शिक्षण घेतात. त्यातच सैन्य दलात महिलांची संख्या वाढली पाहिजे. सैन्य दलात करिअर करण्यासाठी एक-दोन नव्हे तर तब्बल १५० मार्ग आहेत.
विद्यार्थ्यांना सैन्य दलातील क्लासवन अधिकारी होण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षा, प्रवेश परीक्षा मार्गदर्शनासाठी पुण्यातील कॅप्टन आशा शिंदे-अलगप्पा यांनी मार्गदर्शन हेल्पलाइन सुरु केली आहे. त्या हेल्पलाइनच रविवार २ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता सोलापूरमध्ये मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
दहावी, बारावीनंतर एन.डी.ए. आणि पदवीनंतर सी.डी.एस. या स्पर्धा परीक्षाची परिपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना व्हावी परीक्षा विविध स्पर्धा परीक्षा माहिती लेखी परीक्षा तयारी, मुलाखत, शारीरिक, मानसीक व शैक्षणिक विकास या वर त्यांचे विशेष मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळते. सन २०२३ मधील विविध प्रवेश परीक्षा अधिकारी भरती संदर्भात मार्गदर्शन साठी त्यांनी ८४४९४७७७७१ हे हेल्पलाइन सुरु करत असून सोलापूरमधील विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असेही आवाहन कॅप्टन आशा शिंदे-अलगप्पा यांनी केले आहे.
सोलापुरात या दिवशी, येथे मिळणार मार्गदर्शन
एप्रिल महिन्यातील प्रत्येक शनिवार व रविवारी मोफत मार्गदर्शन उपलब्ध असणार आहे. यामध्ये २ एप्रिल रोजी महाराष्ट्र कॉम्प्युटर्स गांधी नगर, ९ एप्रिल रोजी ड्रीम आय.ए.एस. सेंटर जुळे सोलापूर, १६ एप्रिल डी.के. एस. कॉम्प्युटर एस.टी. स्टँड आणि २३ एप्रिल रोजी ज्ञानदीप कॉम्प्युटर विजापूर रोड, ३० एप्रिल रोजी विद्यार्थी व पालकांसाठी एक दिवसीय कार्यशाळा सोलापुरात होणार आहे. नाव नोंदणी करण्यासाठी संगीता पाटील ७२१९०९९५५५ या नंबरवर संपर्क साधावा.
ॲम्युनिशन आर्मामेंट, एक्सप्लोजिव सांभाळणारी पहिला महिला
कॅप्टन आशा शिंदे अलगप्पा या १९९५ मध्ये आर्मीमध्ये ऑफिसर म्हणून जॉईन झाले. २००७ मध्ये ॲम्युनिशन आर्मामेंट आणि एक्सप्लोजिवची माहिती असणारी व संभाळणारी पहिली महिला ऑफिसर होती. त्याची सैन्य दलातील ही तिसरी पिढी देश सेवा करत असून या सध्या युवकांना सैनदला मध्ये अधिकारी बनवण्यासाठी मार्गदर्शन, समुपदेशन करत आहेत. त्या स्पेसटाईम ज्ञानदर्शन अकॅडमीच्या संचालिका आहेत.