झेडपीच्या १५२ शाळांना मिळणार मुख्याध्यापक! समाजशास्त्र शिक्षक होणार उपशिक्षक; सोमवारी विस्ताराधिकारी पदोन्नती

जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७९५ शाळांपैकी १५२ शाळांवर मुख्याध्यापकच नाहीत. त्या शाळांना कायमस्वरूपी मुख्याध्यापक मिळणार आहेत. मेअखेरीस दोन विस्ताराधिकारी सेवानिवृत्त होणार असल्याने आता १५ मे रोजी सहा जणांना विस्ताराधिकारीपदी पदोन्नती मिळणार आहे.
शाळा
शाळाEsakal

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७९५ शाळांपैकी १५२ शाळांवर मुख्याध्यापकच नाहीत. त्या शाळांना कायमस्वरूपी मुख्याध्यापक मिळणार आहेत. मेअखेरीस दोन विस्ताराधिकारी सेवानिवृत्त होणार असल्याने आता १५ मे रोजी सहा जणांना विस्ताराधिकारीपदी पदोन्नती मिळणार आहे. त्यानंतर केंद्रप्रमुखांची पदोन्नती होणार आहे.

सेवाज्येष्ठतेनुसार शिक्षक, मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांना विस्ताराधिकारी होण्याची संधी मिळणार आहे. पदवीला ५० टक्के आणि बी.एड.ला देखील ५० टक्के गुण आवश्यक आहेत. अशा पात्र शिक्षकांकडून प्रस्ताव मागविण्यात आले असून त्याची पडताळणी सुरू आहे. सोमवारी (ता. १५) पदोन्नतीची प्रक्रिया पार पाडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

तत्पूर्वी, प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत, अन्यथा उपोषणाचा इशारा शिक्षक संघटनेने दिला आहे. त्याची दखल मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी घेत पदोन्नतीचे वेळापत्रक निश्चित केले आहे. दरम्यान, नकार कळविलेल्या समाजशास्त्र विषयाच्या २१० शिक्षकांना आता उपशिक्षकपदी नेमणूक दिली जाणार आहे. त्यादृष्टिने प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी नियोजन केले आहे.

शाळा सुरु होण्यापूर्वी पदोन्नतीची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडली जाणार आहे. तसेच संचमान्येनंतर शिक्षकांची रिक्तपदे देखील भरली जाणार आहे. १५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरवात झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळांना समान व पुरेशा प्रमाणात शिक्षक मिळतील, अशी भरती देखील होणार आहे.

प्रस्तावांच्या पडताळणीनंतर पदोन्नती

जिल्हा परिषद शाळांवरील सहा विस्ताराधिकाऱ्यांची पदे आता पदोन्नतीने भरली जाणार आहेत. सेवाज्येष्ठतेनुसार संबंधितांचे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. त्याची काटेकोर पडताळणी करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. १५ मे रोजी पदोन्नतीची कार्यवाही करण्याचे प्रस्तावित आहे.

- दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

केंद्रप्रमुख पदोन्नतीवर मागविले मार्गदर्शन

केंद्रप्रमुख पदासाठी सेवाज्येष्ठतेनुसार शिक्षक, मुख्याध्यापक पात्र ठरतात. पण, तो शिक्षक बीए, बीएड, प्रशिक्षित पदवीधर असणे आवश्यक आहे. दरम्यान, जिल्ह्यात सध्या १९९ केंद्रप्रमुखांची पदे रिक्त असून त्यातील ९९ पदे सरळ सेवेतून भरली जाणार आहेत. तर १०० पदे पदोन्नतीने भरली जाणार आहेत. मुख्याध्यापक, विस्ताराधिकाऱ्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर केंद्रप्रमुखांची पदे पदोन्नतीनेच भरणार आहेत. तोवर शिक्षण संचालकांकडून पदोन्नतीसंदर्भातील मार्गदर्शन देखील येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com