सांगोला पोलिसांच्या मदतीला धावले जवान 

sangola news 1.jpg
sangola news 1.jpg

सांगोला (सोलापूर) : "कोरोना' संसर्गाचा प्रादुर्भाव सुरू होण्यापूर्वी देशाच्या सुरक्षेसाठी विविध भागात तैनात तालुक्‍यातील जवान गावाकडे आले होते. "कोरोना' कालावधीत त्यांना घरीच थांबण्याचे आदेश दिले आहेत. सध्या उद्‌भवलेल्या स्थितीत सुटीस आलेले 20 जवान कोरोना संकटातही शनिवारपासून (ता. 18) स्थनिक पोलिसांच्या मदतीला धावले आहेत. जवानांच्या देशप्रेमाने सांगोलकर भारावले आहेत. तसेच, जवानांच्या भावनांचा आदर करत पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी जवानांना त्याच्या योग्यतेनुसार पोलिसांच्या मदतीला नेमले आहे. 

"कोरोना' विळख्यात अडकलेल्या देशातील नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी देशातील व राज्यातील सर्व शासकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी, आरोग्य अधिकारी, डॉक्‍टर, नर्स, वार्डबॉय, पोलिस दिवस-रात्र सेवा करत आहेत. अशा स्थितीत भारतावर जीवापाड प्रेम करणारा आमचा जवान मागे राहीलच कसा. करोना संक्रमणपूर्वी सांगोला तालुक्‍यातील 20 जवान पूर्वपरवानगी घेऊन रजेवर आले होते. सध्या लॉकडाउनचा कालावधी वाढल्याने संबंधित प्रशासनाने या जवानांची पुढची रजा वाढविली आहे. परंतु, देशावर आलेल्या "कोरोना'रूपी संकटकाळात घरात बसेल तो देशभक्त जवान कसला. 20 जवानांनी सद्यस्थितीत नागरिकांची सेवा करणे गरजेचे असल्याचा निश्‍चय केला. सांगोला पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांची जवानांनी भेट घेऊन सेवा करण्याची संधी द्यावी असे सांगितले. पोलिस निरीक्षक गवळी यांनी त्यांच्या भावना लक्षात घेऊन तत्काळ आपल्या पोलिस सहकाऱ्यांबरोबर जवानांना मदतनीस म्हणून नेमणूक करत शनिवारपासून (ता. 18) कर्तव्य बजावण्यास सांगितले. सध्या सर्व जवान पोलिस कर्मचाऱ्यांबरोबर त्यांच्या सूचनांचा आदर करीत रस्त्यावर नागरिकांच्या सुरक्षेसाठी उतरले आहेत. चौकाचौकात भर उन्हात पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून त्यांना मदत करत असल्याने सांगोलकर त्यांच्या देशसेवेने भारावले आहेत. 

संकटकाळी मदत करणे भारतीय संस्कृती 
सुटीस आलेल्या जवानांनी पोलिसांबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. आम्ही या जवानांना त्यांच्या आवडीनुसार स्थितीनुरूप सेवा करण्याची संधी दिली. जवानांच्या देशसेवेबाबतचा मलाही खूप आदर वाटतो. संकटकाळात मदत करणे ही भारतीय संस्कृतीच आहे. 
- राजेश गवळी, पोलिस निरीक्षक, सांगोला 

देश संकाटात असताना आम्ही घरात बसणे योग्य नाही 
देशसेवा करणे आमचे कर्तव्य असून देश कोरोना संकटाशी सामना करत असताना आम्ही घरात बसणे योग्य नव्हते. त्यामुळे आम्ही सुटीवर आलेल्या जवानांनी एकत्र येऊन या काळात पोलिसांना मदत करण्याचे ठरवले. सांगोला पोलिसांनी आम्हाला सेवा करण्याची संधी दिली आहे. प्रत्येकाने देशासाठी, समाजासाठी काहीतरी सेवा करावी. देशसेवा करणे आमचे कर्तव्यच आहे. 
-हरिदास केदार, बीएसएफ जवान, वासुद-अकोला, सांगोला 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com