
Solapur News : पॅनकार्ड आणि आधारकार्ड लिंकसाठी मार्च अखेरची मुदत
सोलापूर : पॅनकार्ड व आधार कार्ड लिंक करण्याची मुदत मार्च अखेरची आहे. या दरम्यान पॅनकार्ड लिंक नाही केल्यास पॅनकार्ड ‘नॉन ऑपरेटीव्ह’ होणार असून पॅनसंबंधित सर्व आर्थिक व्यवहार अडचणीत येणार आहेत.चालू वर्षाचे रिटर्न भरण्याला जुलै अखेरपर्यत मुभा देण्यात आली आहे. तर सन २०-२१ चे रिटर्न याच महिन्यात भरणे आयकर विभागाने बंधनकारक केले आहे.
मार्च एंडिंग म्हटले की आयटी रिटर्नचे वेध लागतात. यावर्षी मार्च एंडींगला मात्र नव्या बदलामुळे केवळ मागील काळातील रिटर्न अधिक कर देयक रकमेसह फाईल करुन घ्यायचे आहेत, जे की ITR (U) मध्ये जाईल. ज्यात आपल्याला नवीन काही वजावट व त्या काळातील रिफंड मागता येणार नाही. तर १००० रूपये लेट फी सह पॅन कार्ड व आधार कार्ड लिंकींगची मूदत ३१ मार्चला संपत असल्याने त्याला प्राधान्य द्यावे लागणार आहे.
आयकर रिटर्न भरण्याच्या बाबतीत मागील वर्षापासून नवे बदल झाले आहेत. त्यानुसार चालू आर्थिक वर्षात म्हणजे वर्ष २०२१-२२ चे आयटी रिटर्न मार्च अखेरी पर्यंत भरू शकत होतो ते डिसेंबर अखेर पर्यंत करण्यात आले आणि त्यानंतर त्या वर्षाचे फक्तं अद्यायावत आयकर रिटर्न हे फाईल करता येईल. आता या महिना अखेरीपर्यंत वर्ष २०२०-२१ चे रिटर्न अपडेट करुन घेऊ शकता यानंतर त्यात काही मुभा मिळू शकणार नाही.
या शिवाय याच महिन्यात आधार व पॅन कार्ड लिंकेजची मूदत ३१ मार्च अखेरपर्यंत संपणार आहे. तसेच त्यासाठी एक हजार रुपये दंड देखील भरावा लागणार आहे. महिना अखेरपर्यंत लिंकेज केले नाही, तर संबंधितांचे पॅन कार्ड हे नॉन ऑपरेटीव्ह होणार आहे. त्यामुळे पॅनशी जोडलेले सर्व व्यवहार अडचणीत येणार आहेत.
मार्च अखेरीपर्यंत वर्ष २०२०-२१ चे आयकर रिटर्न अपडेट करुन घेणे आवश्यक आहेत. तसेच पॅन व आधारकार्डाचे लिंक देखील ३१ मार्च पुर्वी करुन घ्यावे लागणार आहेत.
- सीए शुभम नोगजा, कोषाध्यक्ष, सोलापूर सी ए शाखा, सोलापूर