मोहोळ येथील मेळाव्यात सातशे रुग्णाची तपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरोग्य मेळाव्याची माहिती घेऊन मार्गदर्शन करताना डॉ ढेले.

मोहोळ येथील मेळाव्यात सातशे रुग्णाची तपासणी

मोहोळ - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त मोहोळ येथील  ग्रामीण रुग्णालयात तालुका स्तरीय महाआरोग्य मेळावा संपन्न झाला. यात आयुष्यमान भारत आरोग्याचे कार्ड, राष्ट्रीय हेल्थ कार्ड ची नोदणी करण्यात आली. विविध आजाराची तपासणी करण्यात आली. या आरोग्य मेळाव्यात एकूण 689 रुग्णांची तपासणी करण्यात आली. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार ,राष्ट्रीय आरोग्य अभियान व सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये आरोग्य मेळाव्याचे ता. 22 एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उदघाटन आमदार यशवंत माने यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रदीप ढेले, अजिंक्यराणा पाटील, गटविकास अधिकारी गणेश मोरे, रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. विदुला बाबर, राष्ट्रीय बालस्वास्थ. आधिकारी डॉ. किरण पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अरुण पात्रुडकर, डॉ. बालाजी गवाड, डॉ. पवन शिंदे, डॉ. प्रल्हाद गायकवाड, डॉ. शीतल होळकर, डॉ. तेजस्वीनी जाधव, डॉ. किसन ढवळे, डॉ. शैलेश झाडबुके, डॉ. सत्यजीत मस्के, डॉ. वृषाली राऊत , डॉ. चेतन आयवळे, डॉ. हुसेन मुजावर, डॉ. जिलानी खान, डॉ. आत्तार , डॉ आसिफ हरणमारे डॉ होळकर प्रमोद डोके, हेमंत गरड, सीमा पाटील,अतुल गावडे, रुग्ण कल्याण समिती सदस्य रुपेश धोत्रे, राजन घाडगे, सुशील क्षीरसागर, मुस्ताक शेख ,भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष सतीश काळे, विजयकुमार पोतदार, शकील शेख, गौतम क्षीरसागर, राजू सुतार आदी उपस्थित होते.

या आरोग्य मेळाव्यात सुमारे 310 जणांची तपासणी करण्यात आली, तर हेल्थ कार्ड 103 एक्स-रे 26 , ई सी जी 14 काढण्यात आले. ग्रामीण रुग्णालयाच्या परिचारिका गुरुदेवी रासुरे,ज्योती अष्टूळ, आर.आर. खान, के एम कांबळे ,विना घोडके, सुरेखा जेऊरकर, पल्लवी क्षीरसागर, पी. जमादार ,प्रगती लोंढे, प्रीती साबळे, सोनी, हिरेमठ, माधुरी पराडकर, माधवी पाटील, लॅब टेक्निशियन सचिन गायकवाड, पवन पवार, शेख मॅडम, वायकर मॅडम, शुभांगी गवळी, सुशांत भोसले, गोविंद व्यवहारे, विजय झुंबड, ब्रह्मदेव साळुंके , सचिन वाघुले यांनी अथक परिश्रम घेतले तर कार्यालयीन अधिक्षक गणेश धोत्रे यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.

Web Title: 700 Petient Checkup In Mohal Rally

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top