Gram Panchayats election : करमाळा 28 ग्रामपंचायतीसाठी 82.46% मतदान

14660 स्त्रियांनी तर 17,256 पुरुषांनी मतदानाचा हक्क बजावला.
82 percent polling for Karmala 28 Gram Panchayats election solapur politics
82 percent polling for Karmala 28 Gram Panchayats election solapur politicsEsakal

करमाळा : तालुक्यात 28 ग्रामपंचायतीसाठी शांततेत मतदान पार पडले. तालुक्यात सरासरी 82.46% मतदान झाले. यामध्ये14660 स्त्रियांनी तर 17,256 पुरुषांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण 31 हजार 916 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला, तालुक्यात कोठेही अनुचित प्रकार घडला नसून सर्वत्र शांततेत मतदान पार पडले असल्याची  माहिती तहसीलदार समीर माने यांनी दिली आहे. तालुक्यात सर्वात कमी मतदान गोयगाव (52.71)टक्के एवढे तर सर्वाधिक मतदान दहिगाव ग्रामपंचायतीसाठी 92.96 टक्के  एवढे झाले. तालुक्यातील दहीगांव , जिंती,वाशिंबे, विहाळ, कुंभारगाव  ,सोगांव, पारेवाडी ,भिलारवाडी, हिंगणी , तरटगांव ,पोंधवडी या ठिकाणी चुरशीने मतदान झाले.

बाहेरगावच्या मतदारांना मतदानासाठी घेऊन येण्यासाठी सर्वच उमेदवारांची सकाळपासून धावपळ सुरू असल्याचे दिसून आले.तालुक्यातील अति संवेदनशील मतदान केंद्रावर विशेष पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ.प्रशांत हिरे,पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांनी यांनी दहीगांव, शेवगाववा ,उंदरगाव ,देलवडी ,जिंती ,पारेवाडी ,वाशिंबे, मांजरगाव, या मतदान केंद्रांना भेटी दिल्या. मतदानात अनुचित प्रकार घडू नये म्हणून शेलगाव वा व दहिगाव येथील ग्रामस्थांनी विशेष पोलीस बंदोबस्ताची मागणी केली होती. या ठिकाणी विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता कोणताही अनुचित प्रकार न घडता येतील मतदान शांततेत पार पडले.

करमाळा तालुक्यात 28 ग्रामपंचायतीसाठी झालेले मतदान टक्केवारीपुढील प्रमाणे

वरकाटणे 75.58 ,पोफळज 80. 05,शेलगाव वा 79 98, दहिगाव 92.96 , खडकी 86.48,तरटगाव 89.54, कामणे 92.98,पोंधवडी 85.21,अंजनडोह 81.12,मोरवड 88.62, विहाळ 89.06,मांजरगाव 85.34,टाकळी रा.81.08, कात्रज,84.77, पोमलवाडी 87.22, कोंढरचिंचोली 82.28,खातगांव 84.68,पारेवाडी 86.85,गोयगाव 52.71,रिटेवाडी 92.81,सोगाव 92.76,वाशिंबे 94.71, कुंभारगाव ,63.69 भिलारवाडी 83.99, हिंगणी 87.38, देलवडी 82.64,दिवेगव्हाण 95.23, जिंती 78.59

करमाळा तालुक्यातील कुंभारगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या घरात वाडी ग्रामस्थांनी गावातील रस्त्याची समस्या सोडवण्यासाठी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. घरतवाडी ग्रामस्थांच्या मागणीकडे कोणी न लक्ष दिल्याने गरज वाडी ग्रामस्थांनी मतदान केले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com