8408 शेतकऱ्यांच्या तक्रारीचे विमा कंपनीकडून सर्वेक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

agriculture loss

यंदाच्या खरीप हंगामात बाजरी, तूर, मका, सुर्यफुल, भूईमूग, कांदा या पिकाची पेरणी शेतकऱ्यांनी केली. सुर्यफुलाचे क्षेत्र तालुक्यात असताना विमा कंपनीकडून सुर्यफुलाला विमा सरंक्षण दिले नाही.

8408 शेतकऱ्यांच्या तक्रारीचे विमा कंपनीकडून सर्वेक्षण

मंगळवेढा - खरीप हंगामात झालेल्या अवकाळी पावसाने तालुक्यातील शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान केले असून, त्यामध्ये पिकविमा भरलेल्या तालुक्यातील 19083 शेतकऱ्यांपैकी 8408 शेतकय्रांनी ऑनलाईन तक्रारी केल्या असून त्या तक्रारीची दखल घेत अ‍ॅग्री इन्सुरन्स विमा कंपनीकडून बाधीत शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात येते आहे. परंतु विमा न भरलेल्या शेतकऱ्यांचेही खरीप पिकाचे नुकसान झाले. शासनकडून मदती बाबत कोणताच निर्णय झाला नसल्याने हे शेतकरी हवालदिल झाले.

यंदाच्या खरीप हंगामात बाजरी, तूर, मका, सुर्यफुल, भूईमूग, कांदा या पिकाची पेरणी शेतकऱ्यांनी केली. सुर्यफुलाचे क्षेत्र तालुक्यात असताना विमा कंपनीकडून सुर्यफुलाला विमा सरंक्षण दिले नाही. त्यामुळे बाजरी, तुर, मका अशा तालुक्यातील 8 महसूल मंडलमधील 19083 शेतकऱ्यांनी खरीप पिकाचा विमा भरला. नुकसान झालेल्या नुकसानीची पूर्व सूचना नुकसानी पासून 72 तासाच्या आत द्यायच्या नव्या नियमामुळे तालुक्यातून आठ हजार 408 शेतकऱ्यांनी ऑनलाइन तक्रारी नोंदवल्या. या तक्रारीपासून अजूनही बहुसंख्य शेतकरी वंचित आहेत. परंतु, परतीच्या पावसाने तालुक्यातील खरीप पिकासह फळपिकाचे नुकसान केले असून, खरीप पिकाच्या नुकसानीचे अ‍ॅग्री इन्सुरन्स कंपनीने बाधीत शेतकऱ्यांच्या बांधावर जावून नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. पंरतु निम्याहून अधिक शेतकय्रांनी पिकविम्यात सहभाग घेतला नाही. त्यांच्या झालेल्या नुकसानीसाठी देखील मदतीची गरज आहे.

शिवाय ज्या पिकाला विमा सरंक्षण अशा पिकाचेही मोठया प्रमाणात नुकसान झाले. त्यामध्ये सुर्यफूल, सोयाबीनचा समावेश असून, या पिकाचा विम्यात समावेश नसल्यामुळे शासकीय मदतीचे गरज असून अदयाप शासनाने या पिकाच्या मदतीबाबतची घोषणा केली नाही. शिवाय शासकीय यंत्रणेकडून तालुक्यात किती हेक्टरचे नुकसान झाले. हे देखील समोर आले नाही. हवामानावर आधारीत फळपिकाचा विमा भरलेल्या विमा कंपनीकडून अदयापही कोणतीच हालचाल नसल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले. पावसाने बागाचे नुकसान मोठया प्रमाणात केल्यामुळे आदीच अडचणीत असलेला शेतकरी पुन्हा उभारणार कसा? असा सवाल देखील व्यक्त होत आहे. आ. समाधान आवताडे हे सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी असल्याने त्यांनी आपली राजकीय ताकद लावून परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी निधी उपलब्ध करुन देण्यासाठी शासनदरबारी प्रयत्न करावेत अशी मागणी होत आहे.