म्हैसाळच्या पाण्यावरुन श्रेयवाद !

म्हैसाळच्या पाण्यावरुन श्रेयवाद !
Summary

नुकत्याच झालेल्या पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा राजकीय आखाडा पाणी प्रश्नावरून मोठा गाजला. त्यामध्ये म्हैसाळ, मंगळवेढा उपसा सिंचन योजना या योजनेवर आरोप-प्रत्यारोप देखील झाले.

मंगळवेढा (सोलापूर) : म्हैसाळचे पाणी (mahisal water) शनिवारी 21 वर्षांनंतर मंगळवेढा तालुक्‍याच्या दक्षिण भागात कालव्यातून आले. परंतु पाण्याचा श्रेयवादावरून सोशल मीडियामध्ये भगीरथ भालके (bhagirath bhalke) व आ. प्रशांत परिचारक (prashant paricharak) यांच्या समर्थकात आरोप प्रत्यारोपासह शाब्दीक खडाजंगी सुरू झाल्या आहेत. त्यामध्ये वर्तमानपत्रातील जुन्या बातम्या व व्हिडीओ क्‍लिप असा आधार घेतला जात आहे. (A dispute has started between bhagirath bhalke and prashant paricharak over the water issue of mahisal)

नुकत्याच झालेल्या पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा राजकीय आखाडा पाणी प्रश्नावरून मोठा गाजला. त्यामध्ये म्हैसाळ, मंगळवेढा उपसा सिंचन योजना या योजनेवर आरोप-प्रत्यारोप देखील झाले. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रचार सभेत दिलेला शब्द पाळला. त्यामधील मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचे सर्वेक्षण देखील सुरू झाले. शनिवारी सकाळी त्यांच्या फेसबुक पेजवर म्हैसाळचे पाणी मंगळवेढ्यास देण्यात आल्याने दिलेला शब्द पाळल्याचे म्हटले.

म्हैसाळच्या पाण्यावरुन श्रेयवाद !
मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचा सर्व्हे सुरू; 24 गावांना पाणी देण्याचा प्रयत्न

पोटनिवडणुकीच्या आखाड्यात भाजपाचे समाधान आवताडे हे विजयी झाले त्या विजयामध्ये आ. प्रशांत परिचारक यांचे योगदान मोठे आहे. शिवाजी चौकात आ. प्रशांत परिचारक यांनी दंड थोपटले होते. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी भगीरथ भालके यांनी त्याला प्रत्युत्तर देत दंड थोपटायचे होते तर स्वतः का उभे राहिले नाही? असा सवाल करून हिम्मत असेल तर 2024 ला उभे रहा असे आव्हान दिले.

हे वादळ शमते न शमते तोपर्यंत आज म्हैसाळ योजनेची मंगळवेढा वितरिका क्र.2 माध्यमातून पाणी मंगळवेढ्यातील दक्षिण भागात आले. त्यावेळी भगीरथ भालके यांनी त्यांच्या समर्थकांसह जाऊन पाण्याचे पूजन केले. त्याचे फोटो सोशल मीडिया टाकल्यानंतर आ. प्रशांत परिचारक व आ.समाधान आवताडे यांनी देखील या पाण्याचे पूजन करून त्याचे फोटो सोशल मीडिया टाकले. या प्रचारात स्व. भालकेनी आतापर्यंत अशा पद्धतीने प्रयत्न केले हे त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियामध्ये सांगितले. तर आ. परिचारक गट समर्थकांनी माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यासमवेत काम सुरू असलेल्या ठिकाणी भेटीच्या बातम्याची कात्रणे सोशल मीडियावतर टाकली. पंतप्रधान सिंचन योजनेतून प्रास्तावित 7 योजनेपैकी म्हैसाळसाठी अंदाजे तीन हजार कोटी रुपये या योजनेसाठी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी पैसे उपलब्ध करून दिल्यामुळे या योजनेचे पाणी या भागाला आल्याचे भाजप समर्थकांनी सांगितले.

म्हैसाळच्या पाण्यावरुन श्रेयवाद !
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आगामी निवडणुकांमध्ये राबवणार पंढरपूर-मंगळवेढा पॅटर्न !

सायंकाळच्या सत्रात भालके समर्थकांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीतील मंगळवेढा येथील प्रचार सभेतील स्व. भारत भालके यांच्या भाषणाची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर टाकली. त्यामध्ये भालकेनी परिचारकावर विधिमंडळात एक ही शब्द न उच्चारता, 35 गावाला बाटलीभर देखील पाणी मिळणार नाही, अशी खिल्ली उडवण्याचा समाचार घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात आला. तर भाजप समर्थकांनी 2009 च्या विधानसभा पूर्वी एका मुलाखतीमधील स्व.आ. भालके यांनी म्हैसाळ योजना बदल मांडलेले मताचे कात्रण सोशल मीडियावर टाकले. त्यामध्ये ही योजना मृगजळ असून पाणीपट्टी जास्त असल्याचे परवडत नसल्याचे म्हटले आहे. तर आवताडे यांच्या प्रचार सभेतील भाषणाला स्व.भालके यांच्या प्रचार सभेचे व्हिडीओ क्‍लिप जोडून सोशल मीडिया व्हायरल केले जात आहे. एकूणात म्हैसाळच्या पाणी प्रश्नावरून भालके व परिचारक यांच्या श्रेयवादावरून वाद सुरू असतानाच सर्वसामान्य नागरिकांची मात्र करमणूक होत आहे. (A dispute has started between bhagirath bhalke and prashant paricharak over the water issue of mahisal)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com