अक्कलकोटजवळ (शिरवळ) कार अन्‌ ट्रकचा भीषण अपघात! चिमुकल्यास तिघांचा जागीच मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

accident
शिरवळजवळ कार अन्‌ ट्रकचा भीषण अपघात! चिमुकल्यास तिघांचा जागीच मृत्यू

अक्कलकोटजवळ (शिरवळ) कार अन्‌ ट्रकचा भीषण अपघात! चिमुकल्यास तिघांचा जागीच मृत्यू

सोलापूर : आळंदीहून इंडिकडे भरधाव वेगाने निघालेल्या चारचाकी कारची समोरून येणाऱ्या फरशीच्या ट्रकला शिरवळजवळ (ता. अक्कलकोट) जोरात धडक बसली. त्यात एका चिमुकल्यास दोन पुरुषांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक राजेंद्र गौर यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. मृतांची ओळख पटवली जात आहे. गौर हे स्वत: घटनास्थळी दाखल झाले आहेत. मदतकार्य युध्दपातळीवर सुरु आहे.

वेगाने केला घात

वागदरीवरून फरशी घेऊन सोलापूरच्या दिशेने येणाऱ्या ट्रकला इंडिकडे जाणाऱ्या चारचाकीने समोरून धडक दिली. दोन्ही वाहनांचा समोरासमोर अपघात झाला आहे. चारचाकीचा वेग खूप होता. रस्ता मोठा असतानादेखील कारचालकाचा ताबा सुटला आणि सरळ कार ट्रकला धडकली. त्यात कार चालकासह तिघांचा मृत्यू झाला आहे. पोलिस उपअधीक्षक राजेंद्र गौर, अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्री. कोळी हे आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले आहेत. अतिवेग व सलग ड्रायव्हिंग हेच अपघाताचे कारण असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.