Aaditya Thackeray : आजचे मस्तीमधील सुरू असणारे राजकारण बंद केले पाहिजे : आदित्य ठाकरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aaditya Thackeray

Aaditya Thackeray : आजचे मस्तीमधील सुरू असणारे राजकारण बंद केले पाहिजे : आदित्य ठाकरे

सांगोला : हे खोके सरकार निर्दयी व घटनाबाह्य आहे. सरकारविरुद्ध आज मस्तीमधील सुरू असणारे राजकारण बंद केले पाहिजे बोलले की नेत्यांना अटक केली जाते, महिलांविषयी अपशब्द बोलले जात आहे. शेतकरी तर मोठ्या प्रमाणात त्रस्त आहेत. आपल्या राज्यात लोकशाहीला मोठा धोका निर्माण झाला आहे. आज मस्तीमधील सुरू असणारे राजकारण बंद केले पाहिजे असा इशारा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

सांगोला तालुक्यातील संगेवाडी येथे बुधवार (ता. 9) रोजी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांची संवाद साधल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. संजय राऊत यांच्या जामीन विषयी प्रश्न विचारले असता ठाकरे म्हणाले की, संजय राऊत हे निष्ठावंत आहेत, नुसतं नाव लावून फिरत नाहीत. कारवाई झाली तरी पळून गेले नाहीत. जे डरपोक आहेत ते पळून जातात. संजय राऊत यांना जामीन मिळाल्याबद्दल मला आनंद आहे. या निर्णयाचे मी स्वागत नक्कीच करतो. खरं बोलणारा शिवसैनिक, खरं बोलणारा नागरीक या निर्णयाचा स्वागतच करेल. फक्त पंचनामे करण्याचा देखावा करून चालणार नाही तर राज्यात ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे.

खोक्यांच्या प्रश्नाविषयी बोलताना ठाकरे म्हणाले की, आम्हालाच काय पण राज्यातील 13 कोटी जनतेला नोटीसा बजावल्या पाहिजेत. बैलपोळ्याच्या दिवशी खोके लिहिलेल्या त्या दोन बैलांनाही नोटीसा बजावल्या पाहिजेत. परंतु ओके बोलल्यानंतर त्यांचे एवढं का झोंबतय हाच खरा प्रश्न आहे. नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी किती टक्के नुकसान झाले हे पाहिले जात असल्याबद्दल ठाकरे यांना विचारले असता ते म्हणाले की, हे सरकारच टक्केवारीच असल्यामुळे याविषयी काय बोलणार. सरसकट नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिली पाहिजे असे ठाकरे यांनी सांगितले. आपला देशच हुकूमशाहीकडे चालला असल्याचे दिसून येत आहे. सांगोल्यात सर्व ओके आहे का या प्रश्नाला उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, आज सांगोल्यातच काय पण एका व्यक्तीच्या राक्षसी महत्वकांक्षामुळे महाराष्ट्र मागे चालला आहे. उद्योग बाहेर चाललेत, बेरोजगारी संख्या वाढतेय, शेतकरी मोठा त्रस्त आहे.

आबांनी तालुक्याच कमावलेलं नाव आज कुठं नेलं जातंय -

स्वर्गीय गणपतराव आबांनी तालुक्याचे कमावलेलं नाव आज कुठे नेलं जातय याविषयी प्रश्न उपस्थित होत आहे. एका माणसामुळे या मतदारसंघाचे नाव इकडे तिकडे होत असेल तर इकडील सर्व जनताच या मतदारसंघाचे नाव पुन्हा एकदा कमावलेल्या स्तरावर आणली जाईल याविषयी मला निश्चितपणे खात्री आहे.