अक्कलकोट : भाविकांना प्रतीक्षा पर्यटक निवासाची

प्रारंभासाठी अक्कलकोटकरांना मिळतेय ‘तारीख पे तारीख’
Akkalkot
Akkalkot sakal

अक्कलकोट: गेल्या अनेक वर्षांपासून पूर्णत्वास जाण्याच्या प्रतीक्षेत असलेले अक्कलकोट येथील महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे पर्यटक निवास सुरू करण्यासाठी पुन्हा ‘तारीख पे तारीख’ दिली जात आहे.

अक्कलकोटच्या पर्यटक निवासाच्या सर्व सात खोल्या आणि हॉल हे सुसज्ज होऊनही आणखी काही किरकोळ कामे व नगरपरिषदेकडून मिळणारा वापर परवाना यामुळे अक्कलकोटचे पर्यटन निवास पर्यटकांच्या सेवेस दाखल होण्यास आणखी अंदाजे महिना ते दीड महिना लागण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. पर्यटक विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांच्या माहितीनुसार आता पंधरवड्यात भाविकांच्या स्वागतास सज्ज होऊन सेवेत रुजू होणार आहे. तरी यामागील काळात गेल्या सहा सात महिन्याच्या काळात पंधरा दिवसाची मुदत अनेक वेळा दिली गेली आहे. वारंवार काही ना काही अडचणी येत जाऊन पर्यटन निवास सुरू होण्यास वेळ लागत असल्याने भाविकातून नाराजी व्यक्त होत आहे.

Akkalkot
Russia Ukraine: मंगळवेढ्याचे पाच जण सुखरूप मायदेशी

पर्यटक निवास हे बांधून गेल्या अनेक वर्षांपासून तयार आहे पण ते सुरू करण्यासाठी आवश्‍यक अंतर्गत सोयीसुविधांचा कमतरता ही अडचण होती. ती आता हळूहळू दूर होत आहे. आता एकूण सात वातानुकुलीत खोल्या आणि दोन बहुउद्देशिय सभागृह भाविकांच्या सेवेत रुजू केले जाणार आहे. त्यानंतर तिथे एक उत्तम दर्जाचे उपहारगृहदेखील

येत्या काळात सुरू केले जाणार आहे. पण त्यासाठी निधीची आवश्‍यकता असल्याने ते काम इतक्‍यात पूर्ण होण्याची शक्‍यता कमीच आहे. तूर्त खानपान सुविधा ही आउटसोर्सिंग करून द्यावे लागणार आहे. परंतु सध्याच्या प्राप्त परिस्थितीत तिथला परिसरात असलेली अस्वच्छता दूर करून तो पूर्णतः निर्जंतुक करणे आवश्‍यक आहे. टाळेबंदीमुळे कंटाळलेल्या पर्यटकांना पर्यटन विषयक सुविधा, खाद्यपदार्थांची माहीती, आसपासच्या निसर्गाची माहीती, स्थानिक खेळ, परंपरा, सांस्कृतिक कार्यक्रम, वन्यजीव, वृक्षवल्ली, तसेच महामंडळामार्फत पर्यटकांसाठी घेण्यात येणारी खबरदारी, सुरक्षिततेच्या उपाययोजनायांची माहीत वेबसाईट, फेसबुक आणि व्हाट्‌सएप ग्रुपच्या माध्यमातून देण्यात येत आहे. पर्यटक निवास सुरू झाल्यानंतर इथे मनोरंजन कार्यक्रम घेतले जाणार आहेत त्यात स्थानिक कलाकारांचे सादरीकरण, जादूचे प्रयोग, लोककला आदी सादर केले जाणार आहेत जेणेकरून याठिकाणी पर्यटकांचा ओढा वाढला जाणार यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

Akkalkot
अतिरिक्‍त उसाने डोळ्यात अश्रू! शेतात ऊस जळतोय, तरीही शेतकरी संघटना गप्प का?

वायफाय सुरू करण्याची मागणी

कार्यालयातील कर्मचारी वर्गालाही एकाच वातावरणात सतत काम करून मानसिक थकवा येतो. त्यांच्या क्रयशक्तीवरही परिणाम होतो. नोकरदारवर्गाची जशी अडचण होते तशीच अडचण विविध प्रकल्पांवर काम करणारे अधिकारी, गुंतवणूकदार किंवा व्यापारी, उदयोजकांचीही होते. अशा सर्वच घटकांना निसर्गरम्य ठिकाणी पर्यटनाचा आनंद घेत कामही करता यावे, यासाठी महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या रिसॉर्टवर वायफाय झोनची सुविधा येत्या काळात देण्याचा प्रयत्न केला जावा ही अपेक्षा भाविकांची आहे

पर्यटक निवास बुकिंगची ऑनलाइन सोय

अक्कलकोट इथे सुरू होत असलेल्या पर्यटक निवासात ते रीतसर प्रारंभ झाल्यावर http://www.maharashtratourism.gov.in या वेबसाईटवर बुकिंग सुरू होणार आहे आणि ते ऑनलाइन करून याचा लाभ घेता येणार आहे. किंवा (०२०) २६१२८१६९ या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. जेणेकरून भाविकांची गैरसोय होऊ नये, याची काळजी घेतलजी जाणार आहे.

अक्कलकोट येथे लवकरच सुरू होणारे पर्यटक निवास सर्व दृष्टीने काळजी घेऊन परिसर स्वच्छता व सोयीसुविधा याचा विचार करून केला जात आहे. आगामी काळात पर्यटकांचा ओढा इथे वाढावा यासाठी कर्मचारी वर्ग असणार आहे आणि त्याद्वारे विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. भाविकांनी कोरोना नियमांची काळजी घेऊन अक्कलकोट पर्यटक निवास सुरू झाल्यानंतर लाभ घ्यावा.

- दीपक हरणे, पर्यटन विकास महामंडळ प्रादेशिक व्यवस्थापक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com