रुणानुबंधनाच्या जिथून पडल्या गाठी ; भेटीत तृष्ठता मोठी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

solapur

रुणानुबंधनाच्या जिथून पडल्या गाठी ; भेटीत तृष्ठता मोठी

सलगर बुद्रुक : रुणानुबंधनाच्या जिथून पडल्या गाठी,भेटीत तृष्ठता मोठी,या बाळ कोल्हटकरांच्या सुदंर काव्या प्रमाणे वातावरण तयार झाले होते.साठ वर्षाच्या शैक्षणिक वाटचालीत विद्यालयातील अनेक पाखरे घरट्यापासून दूर गेली होती.ती आज पुन्हा या शिक्षण संकुलात कांही क्षणासाठी विसावली अन विद्यालयाच्या जुन्या नव्या आठवणींमध्ये हरवून गेली.प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आपल्या शाळेविषयीचा आदर ओसांडून वाहत होता..

दरम्यान बऱ्याच वर्षांनी जुने मित्र,

मैत्रिणी भेटल्यामुळे गपांच्या मैफिली रंगल्या होत्या.थट्टा मस्करीला उधाण आलं होतं.सेल्फी काढण्यासाठी प्रत्येकाची लगबग सुरू होती.याला निमित्त होते ते माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याच्या आयोजनाचे.सलगर बुद्रुक येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विद्यामंदिर हायसकूल व ज्युनियर कॉलेज येथे माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाला.या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी सातारा जिल्हापरिषदेसचे शिक्षण अधिकारी धनंजय चोपडे, मुंबई येथे सेवा देत

असलेले पोलीस दलातील सिनियर पोलीस इन्स्पेक्टर बडोपंत बनसोडे,संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल बिराजदार,उपाध्यक्ष वसंत आसबे,सचिव सुशीलकुमार मेंडगुदली,संचालक अमृतराव पाटील,चंद्रकांत चौखंडे,पिंट्टू कुलकर्णी,शिवाजी कदम,सतीश मेंडगुदली,मारोळी मठाचे मठाधिपती संदेश भोसले महाराज,बालरोगतज्ज्ञ डॉ.सुधीर आसबे,संजय सावंत,एस.आर बनसोडे,लहुराज पांढरे,आसबेवाडीचे सरपंच शाम आसबे,प्रशालेचे माजी प्राचार्य अनुक्रमे रमेश चिनगे,एच एस माळी,एल एस पाटील,ऍडव्होकेट अनिल पाटील,हणमंत मोरे,एम एस परीट,महादेव लिगाडे,रायगोंडा तेली आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रशालेचे प्राचार्य प्रतापराव शिंदे यांनी त्यांच्या टीमच्या मदतीने अतिशय सुरेख अश्या विद्यार्थी स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते.दरम्यान कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांना भोजनाची व्यवस्था केली होती.या कार्यक्रमासाठी एक हाजारा पेक्षा जास्त माजी विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवली होती.

Web Title: Alumni Meeting Celebrated Vidya Mandir

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top