'तिघे एकत्र आल्यावर काय होते, हे पंढरपूरकरांनी दाखवून दिले!'

तिघे एकत्र आल्यावर काय होते हे पंढरपूरकरांनी दाखवून दिले : आमदार प्रशांत परिचारक
तिघे एकत्र आल्यावर काय होते हे पंढरपूरकरांनी दाखवून दिले!
तिघे एकत्र आल्यावर काय होते हे पंढरपूरकरांनी दाखवून दिले!Canva
Summary

पंढरपूर ते सोलापूर या रस्त्यासाठी शुक्रवारी टाकळी सिकंदर येथील चौकात भाजप मोहोळ व पंढरपूर यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

मोहोळ (सोलापूर) : पुणे (Pune) जिल्ह्यातील तालुक्‍याच्या रस्त्याच्या कामासाठी 800 कोटी रुपयांचा निधी देतात, मात्र सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील तालुक्‍याच्या रस्ते कामासाठी केवळ पाच कोटी रुपये देतात, हा दुजाभाव कशासाठी? नागरिकांच्या सुविधांना प्राधान्य दिले पाहिजे, राजकारण कुठेही करून चालत नाही. तिघेजण एकत्र आल्यानंतर काय होते हे पंढरपूरकरांनी (Pandharpur) दाखवून दिले आहे. जनतेचे अनेक प्रश्न आहेत, प्रश्न विचारले तर ते दाखल करून घेतात मात्र पुन्हा प्रश्नोत्तराचा तास रद्द झाल्याचे सांगतात. रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू न झाल्यास यापेक्षा उग्र आंदोलन करू, असा इशारा भाजपचे (BJP) आमदार प्रशांत परिचारक (MLA Prashant Paricharak) यांनी दिला.

तिघे एकत्र आल्यावर काय होते हे पंढरपूरकरांनी दाखवून दिले!
झिरो बजेट शेती! दीड एकरात, चार महिन्यात तब्बल तीन लाखांचे उत्पन्न

पंढरपूर ते सोलापूर या रस्त्यासाठी शुक्रवारी टाकळी सिकंदर येथील चौकात भाजप मोहोळ व पंढरपूर यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्या वेळी आमदार परिचारक बोलत होते. या वेळी आमदार समाधान आवताडे, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, सभापती विजयराज डोंगरे, तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण, पंढरपूरचे तालुका अध्यक्ष भास्कर कसगावडे, युवा नेते प्रणव परिचारक, सुभाष मस्के, दिलीप घाडगे, सुभाष माने, शंकर वाघमारे, राजू गावडे, सुशील क्षीरसागर, दीपक गवळी, मोहन होनमाने, पांडुरंग बचुटे, दीपक पुजारी, माऊली हळणवर, मुजीब मुजावर आदींसह पंढरपूर व मोहोळ तालुक्‍यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आमदार समाधान आवताडे म्हणाले, पंढरपूरला जोडणारे तीन हजार कोटींचे रस्ते झाले आहेत. रस्त्याचे काम जाणून-बुजून व हेतुपुरस्सरपणे रखडले आहे. लवकर काम सुरू न झाल्यास विधानमंडळात धरणे आंदोलन करून सरकारला धारेवर धरू. यापुढील आंदोलन यापेक्षाही तीव्र करू.

जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने रस्त्याच्या कामाला खीळ घातली आहे. मोहोळच्या आमदारांनीही याकडे लक्ष दिले नाही. इंदापूरचे पार्सल तालुक्‍यात आले आहे. आठवड्यातून एक ते दोन वेळा यायचे व कोणाच्यातरी वाड्यावर बसून काम करायचे. माढ्याचे आमदार केवळ उसासाठी संपर्क करतात. राष्ट्रवादी कॉंग्रेसबद्दल नागरिकांत प्रचंड असंतोष आहे. रस्त्याचे काम सुरू न केल्यास दोन्ही आमदार व पालकमंत्री यांच्या घरासमोर आंदोलन करू.

तिघे एकत्र आल्यावर काय होते हे पंढरपूरकरांनी दाखवून दिले!
प्रेमाच्या आमिषेतून 34 हजार अल्पवयीन मुलींना नेले पळवून

सभापती डोंगरे म्हणाले, पंढरपूर- सोलापूर हा राज्य मार्ग असल्याने शासनाने दुर्लक्ष केले आहे. या सरकारच्या भरवशावर राहण्यापेक्षा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करू.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com