esakal | तडवळेत हिंदू-मुस्लिम एकतेचे उदाहरण! शेख कुटुंबीय करतात गौराईची मनोभावे पूजा
sakal

बोलून बातमी शोधा

हिंदू-मुस्लिम एकतेचे उदाहरण! शेख कुटुंबीय करतात गौराईची पूजा

हिंदू-मुस्लिम एकतेचे उदाहरण! शेख कुटुंबीय करतात गौराईची पूजा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

वैराग : भारत देश अनेक धर्म, पंथ, जात, भाषा, प्रांत अशा विविधतेने नटलेला आहे. काहीजण देशात जाती-धर्मांमध्ये फूट पाडून सामाजिक शांततेचा भंग करण्याचा प्रयत्न करत करतात. अशांसाठी हिंदू- मुस्लिम एकतेची एकतेचे प्रतिक म्हणजे तडवळे (ता. बार्शी) येथील शेख-कोतवाल कुटुंबीय आहे. हे कुटुंब तब्बल 100 वर्षापासून हिंदू संस्कृतीप्रमाणे गौरीची मनोभावे पूजा करत आहे.

हेही वाचा: सोनपावलांनी आगमन झालेल्या गौरीसमोर विद्युत रोषणाई

गावांमध्ये जातीपेक्षा मातीसाठी एकमेकांच्या सहकार्यात ग्रामस्थ वाढतात. एकमेकांची दुःखे संभाळून एकमेकांचे सण, उत्सव साजरे करतात. मात्र, अलिकडे हे चित्र दुर्मिळ होऊ लागले असून जातीसाठी माती खायला सुरूवात झाली आहे. अशा दुर्मिळ होत चाललेल्या परिस्थितीत तडवळेचे अल्लाउद्दीन शिलेमान शेख-कोतवाल या मुस्लिम कुटुंबाने मोहरम सणाप्रमाणेच आपल्या घरी जेष्ठा गौरीची पूजा करत शंभर वर्षांची परंपरा जपत समाजापुढे आदर्श ठेवला आहे.

भक्तीमध्ये कोणाताही धर्म वा पंथ नसतो. विविधतेत एकता असणाऱ्या भारतात सबका मालिक एक हेच खरे आहे. सुमारे शंभर वर्षापूर्वी तब्बूलाल कोतवाल रामभक्तीची वचने, अभंग म्हणून दिवसाची सुरुवात करत असे. पुढे शिलेमान शेख-कोतवाल यांनी परंपरा कायम ठेवत घटस्थापना, दीपावली, पोळा, संक्रांत असे सण साजरे करुन एकोपा जपला.

अल्लाउद्दीन शिलेमान शेख यांनी केलेली ऑल इंडिया मुस्लिम कोतवाल कल्याणकारी संघटनेची स्थापना असो की त्यांनी लिहिली व गायलेली देशभक्ती लोकगीते. याव्दारे शेख-कोतवाल कुटुंब हिंदू-मुस्लीम एकोप्याचे कार्य अखंडपणे संभाळत आहे. त्यांना त्यांची पत्नी बिसमिल्ला मुले अंजूम, परविन, कलिम, खुशी हे सर्वजण वेळोवेळी सहकार्य करीत आले आहेत.

सध्या मोठ्या उत्साहात लक्ष्मीचा सण साजरा करण्यात येत आहे. मूर्तीची आरास, खेळणी, लाईटिंग रात्रभर जागून करण्यात येते. त्यांचा हा सामाजिक सलोखा आता परंपरा बनली असून अनेक पिढ्यांसाठी आदर्शवत ठरली आहे.

loading image
go to top