चिंता वाढली! सोलापुरात आणखी 14 जण कोरोनाबाधित

Another 14 corona patients in Solapur
Another 14 corona patients in Solapur

सोलापूर : आज दिवसभरात सोलापुरातील 213 जणांचे कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 199 रिपोर्ट निगेटिव्ह आले असून 14 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये सात महिला आणि सात पुरुषांचा समावेश आहे. आज वाढलेल्या 14 रुग्णामुळे सोलापुरातील एकूण रुग्णांची संख्या 128 झाली आहे. 
आज नव्याने सापडलेल्या 14 रुग्णांमध्ये सोलापुरातील नइ जिंदगी मधील एक महिला,  शास्त्री नगर येथील दोन महिला, फॉरेस्ट चांदणी चौक येथील दोन पुरुष व एक महिला,  भारतरत्न इंदिरा नगर येथील एक पुरुष एक महिला, बापुजी नगर येथील तीन पुरुष एक महिला, भद्रावती पेठ येथील एक पुरुष व लष्कर सदर बझार येथील एक पुरुष यांचा समावेश आहे. आज नव्याने सापडलेले 14 जण हे सर्व कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली. केगाव येथील क्वारंटाइन  कॅम्पमधून आज 214 जणांना घरी सोडण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील 2253 जण सध्या होम क्वारंटाइनमध्ये असून इन्स्टिट्यूशन क्वारंटाइनमध्ये 894 जण आहेत. आयसोलेशन वार्डातील 2080 जणांची कोरोन  चाचणी करण्यात आली असून त्यापैकी एक हजार 887 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. त्यापैकी एक हजार 759 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून 128 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. 193 जणांचे रिपोर्ट अद्यापही प्रलंबित असल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com