सोलापूर : नवीन वर्षात नव्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ST Bus
सोलापूर : नवीन वर्षात नव्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती

सोलापूर : नवीन वर्षात नव्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती

सोलापूर : एसटी महामंडळाचे(msrtc) राज्य शासनात विलिनीकरण करावे या मुख्य मागणीसाठी मागील एसटी कर्मचाऱ्यांनी दोन महिन्यांपासून संप पुकारला आहे. प्रशासनाकडून वारंवार कामावर येण्याचे आवाहन करूनदेखील कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत. यावर उपाय म्हणून प्रशासनाकडून सेवानिवृत्त चालक(retired drivers) असलेल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार असल्याचे प्रशासनांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा: विद्यार्थ्यांना शाळेत बोलावू नका! शाळा 15 फेब्रुवारीपर्यंत बंद

एसटी कर्मचाऱ्यांनी(st workers) २७ ऑक्‍टोबरपासून सुरु केलेल्या संपामुळे विभागातील बससेवा पूर्ण ठप्प झाली आहे. परिवहन मंत्र्यांनी महागाई भत्ता वाढविल्याने काही कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाले. पण बहुतांश कर्मचाऱ्यांनी विलिनीकरणाची मागणीवर ठाम राहत संप कायम ठेवला. दिवाळीसह ऐन सणासुदीच्या व गर्दीच्या हंगामात एसटी कर्मचाऱ्यांनी सुरू ठेवलेल्या आंदोलनामुळे एसटी महामंडळाला मोठा आर्थिक फटका(economical loss) सहन करावा लागला. आधीच कोरोनाच्या दोन्ही लाटेमुळे एसटी सेवा बंद राहिल्याने महामंडळाला कोट्यवधी रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले आहे. .

हेही वाचा: Video : समुद्रात बुडणाऱ्या पर्यटक महिलेचे मुंबई पोलिसांनी वाचवले प्राण!

त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी वाहतूक बंद राहिल्याने या आर्थिक तोट्यात आणखी भर पडत गेली. त्यामुळे एसटी महामंडळाची चाके आता अधिक खोलात गेली आहेत. दोन महिन्यांपासून सुरू एसटी कर्मचाऱ्यांच्या संप सुरू आहे. गत डिसेंबर महिन्यात विभागात केवळ ३० बसेस धावल्या. यातून डिझेल अथवा इतर खर्चदेखील निघत नसल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले. एसटी बंद असल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन करणेदेखील अवघड बनले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कामावर हजर होवून एसटी आणि स्वतःचे नुकसान टाळावे असे वारंवार आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र तरीही एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. कर्मचाऱ्यांचा संप मिटविण्याच्या तोडग्यासह महामंडळाने आर्थिक गणित जमविण्यासाठी एसटी महामंडळाला नवीन वर्षात नव्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून उत्पन्न वाढविण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे हे मात्र निश्‍चित

सोलापूर- पुणे धावणार इलेक्‍ट्रिक बस

राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागाच्या ताफ्यात मार्च २०२२ अखेर दहा इलेक्‍टिक बस दाखल होणार आहेत. सोलापूर कार्यशाळेत चार्जिंग स्टेशनच्या कामास सुरुवात झाली आहे. नव्या वर्षात सोलापूर- पुणे मार्गावर सोलापूरकरांसह सर्व प्रवाशांना इलेक्‍ट्रिक बसमधून प्रवास करता येणार आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :SolapurMSRTC
loading image
go to top