अक्कलकोट तालुक्यात पितापूर येथे दोन कोल्हापूर पद्धतीचे बंधारे मंजूर

अक्कलकोट तालुक्यातील सिंचन क्षमता वाढविण्यासाठी पितापूर येथे 8 कोटी 68 लाख रुपये खर्चाचे दोन कोल्हापूर पद्धतीचे बंधारे मंजूर झाल्याची माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली.
mla sachin kalyanshetty
mla sachin kalyanshettysakal
Summary

अक्कलकोट तालुक्यातील सिंचन क्षमता वाढविण्यासाठी पितापूर येथे 8 कोटी 68 लाख रुपये खर्चाचे दोन कोल्हापूर पद्धतीचे बंधारे मंजूर झाल्याची माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली.

अक्कलकोट - अक्कलकोट तालुक्यातील सिंचन क्षमता वाढविण्यासाठी पितापूर येथे 8 कोटी 68 लाख रुपये खर्चाचे दोन कोल्हापूर पद्धतीचे बंधारे मंजूर झाल्याची माहिती अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली आहे. महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या वतीने 0 ते 100 हेक्टर प्रयत्नच्या सिंचन क्षमतेची कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची निर्मिती प्रस्तावीत होती. त्यानुसार या दोन बंधाऱ्यांची निर्मितीस प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. यातील पितापूर एक येथील बंधारा साठवण क्षमता 250.51 सह्स्त्र घन मीटर एवढा असून, त्याचा खर्च 3 कोटी 59 लाख 91 हजार 213 रुपये असून, अनुषंगिक खर्च 29 लाख 72 हजार 778 रुपये इतका असून, एकूण खर्च हा 3 कोटी 89 लाख 63 हजार 991 रुपये एवढा आहे. आणी त्याची सिंचन क्षमता ही 90 हेक्टर एवढी असणार आहे.

त्याचप्रमाणे पितापूर दोन येथील बंधारा साठवण क्षमता 296.73 सह्स्त्र घन मीटर एवढा असून, त्याचा खर्च 4 कोटी 42 लाख 13 हजार 87 रुपये असून, अनुषंगिक खर्च 36 लाख 49 हजार 750 रुपये इतका असून, एकूण खर्च हा 4 कोटी 78 लाख 62 हजार 837 रुपये एवढा आहे. आणी त्याची सिंचन क्षमता ही 62.9 हेक्टर एवढी असणार आहे. या पितापूर येथील दोन्ही बंधाऱ्यांचा एकूण 8 कोटी 68 लाख रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. पितापूर हे गाव कुरनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रावरील गाव असून, दरवर्षी तुळजापूर भागात मोठा पाऊस होतो, हरणा नदीला पूर येत असतो, त्यामुळे ग्रामस्थ बांधवाना वाडी वस्तीवर जाणे, आणी इतर महत्वाच्या कामासाठी पुराचे पाणी हा अडथळा ठरत होता. या गावतील व भागातील ग्रामस्थांची सतत ही गैरसोय दूर करण्याची मागणी होत होती. अखेर आमदार सचीन कल्याणशेट्टी यांनी लक्ष घालून पाठपुरावा केला होता त्याला यश आले असून, प्रशासकीय मंजुरीने हे कोल्हापुर पद्धतीचे बंधारे बांधून पूर्ण झाल्यास हा प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे.

प्रतिक्रिया

सचिन कल्याणशेट्टी, आमदार अक्कलकोट

पितापूर गावाला दरवर्षी पुराच्या आणी मोठ्या पावसाने पाणी वाढत होते त्यातून ग्रामस्थांना सतत त्रास सहन करावा लागत होता.यासाठी पितापूर येथेच दोन कोल्हापूर पद्धतीचे बंधारे मंजूर झाले आहेत.यातून या भागातील नागरिकांना कायम सोसाव्या लागणाऱ्या त्रासातून सुटका होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com