बी.टेक. शिकणाऱ्या विरेशची कुटुंबासाठी धडपड

अक्कलकोट शहरातील कुंभार गल्लीत रहाणारा विरेश कुंभार हा सध्या बी.टेक.च्या शेवटच्या वर्षात शिकत आहे.
viresh kumbhar
viresh kumbharsakal media

अक्कलकोट: अक्कलकोट शहरातील कुंभार गल्लीत रहाणारा विरेश कुंभार हा सध्या बी.टेक.च्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. उच्च शिक्षण घेत असतानाही जराही न लाजता कुटुंबाचा आर्थिक भार उचलण्यासाठी व स्वतःच्या शिक्षणासाठी प्रत्येक सणासुदीस लागणारे साहित्य विक्री करण्यासाठी दोन-तीन दिवस बाजारात बसून तो मडकी विक्री करत असतो. अन्यावश्‍यक गोष्टी करून कुटुंबाला आर्थिक अडचणीत टाकण्यापेक्षा आई-वडिलांना मदत करून आपले घर पुढे नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरेश कुंभार याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

viresh kumbhar
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनगरकर ‘ॲक्‍टिव्ह मोड’मध्ये

कुंभार काम करणारे विरेशचे वडील भीमाशंकर कुंभार हे कुशल कारागीर आहेत. ते मातीच्या सर्व वस्तू स्वतः बनवितात. सर्व कुंभार कामे विरेशने वडिलांकडून शिकून घेतली आहे. वडिलांनी तयार केलेल्या वस्तूंना विरेश स्वतः आकर्षक रंगसंगती वापरून रंग देतो. कुंभार कला असलेल्या ज्या-ज्या वस्तू प्रत्येक सणाला लागतात, त्याप्रमाणे अगोदर तयार करून ठेवल्या जातात. सणाच्या काळा विरेश आई जयश्री यांना सोबत घेत बाजारात दोन वेगवेगळी दुकान थाटतो. या काळात आपले उच्च शिक्षण विसरून न लाजता कुटुंबाची प्रगती व आपले शिक्षण पूर्ण व्हावे, यासाठी संघर्ष करतो. विरेश प्रत्येक सणावेळी तीन-चार दिवस बाजारात बसून वस्तूंची विक्री करतो.

विरेश हा घटस्थापना वेळी मातीची मडकी विकतो तसेच दसऱ्याच्या वेळी लागणाऱ्या देवीच्या मूर्ती तयार करणे किंवा जुन्या मूर्तींना रंगरंगोटी करणे, कारहूण्णवी व बैलपोळ्यास मातीच्या आकर्षक लहानमोठ्या बैलजोड्या विकणे, दिवाळीसाठी किल्ले तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती तसेच मावळे बनविणे, मकरसंक्रांत वेळी सुगडी विक्री करणे, वेळअमावस्येस छोटे आंबील गाडगे बनविणे, गणेशमूर्ती तयार करून विकणे आदी सर्व वस्तू विरेश स्वतः बनवितो आणि नंतर त्याची बाजारात विक्री करतो. यातूनच विरेशचे शिक्षण आणि कुटुंबाचा चरितार्थ चालतो.

viresh kumbhar
इतर देशांपेक्षा हॉस्टेल-मेसच्या खर्चात पूर्ण होते जर्मनीतील शिक्षण!

"वयाच्या पाच वर्षापासून वडिलांनी तयार केलेल्या मातीच्या विविध कलाकृती बाजारात विक्री करत आहे. त्यावरच आमचे कुटुंब चालते. आता बी.टेक. होतोय म्हणून पारंपरिक काम करणे किंवा घराला मदत करणे सोडणे माझ्या स्वभावात नाही. तरुण मुलांनी कष्ट करून कमवायला मागे पुढे पाहू नये, यातूनच आपल्या कुटुंबाची प्रगती होत असते."

- विरेश कुंभार, मूर्तीकार, अक्कलकोट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com