ढोबळेच्या बहुजन रयत परिषदेची जबाबदारी कन्येबरोबर मुलावर

राष्ट्रवादीत मंत्री असताना माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी राज्यातील शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा वारसा पुढे जतन करून
ढोबळेच्या बहुजन रयत परिषदेची जबाबदारी कन्येबरोबर मुलावर

मंगळवेढा : बहुजन समाजातील दुर्लक्षीत प्रश्नाविषयी आवाज उठवणाऱ्या भाजप नेते माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी स्थापन केलेल्या बहुजन रयत परिषदेच्या युवक प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांचे सुपुत्र अभिजीत ढोबळे यांच्यावर सोपवण्यात आली आहे त्यामुळे या संघटनेची व्याप्ती राज्यात आता वाढणार आहे. रेसिडेन्सी क्लब पुणे येथे बहुजन रयत परिषद महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये संघटनेची पुढील दिशा व वाटचाल, नगरपालिका, जिल्हा परिषद ,महानगरपालिका यांच्या निवडणुक या संदर्भात चर्चा करण्यात आली. त्यात प्रदेश युवक अध्यक्षपदी अभिजीत ढोबळे यांची निवड करण्यात आली.

राष्ट्रवादीत मंत्री असताना माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी राज्यातील शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा वारसा पुढे जतन करून समाजातील दुर्लक्षित प्रश्नाला न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने बहुजन रयत परिषद ही राज्यपातळीवरीर संघटना स्थापन केली या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी राज्यातील अनेक प्रश्न हाती घेतले. शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिवाळीच्या सुट्टीमध्ये वासंतिक वर्गाचे आयोजन करून त्यांना शिक्षणा बाहेरील जगाची ओळख करून दिली त्यासाठी नामवंत वक्ते देखील पाचारण केले त्यामुळे या संघटनेचा पक्षीय पातळीवर प्रभावी वाढू लागल्यामुळे त्याची राजकीय अडचण ढोबळे यांच्या राजकीय जीवनात झाली यात ढोबळे यांचे राजकीय करियरचे देखील नुकसान झाले त्यानंतर या संघटनेचे कार्य गेल्या काही वर्षांपासून थांबले होते परंतु गेल्या वर्षभरापासून या संघटनेचे कार्य पुढे चालविण्याच्या दृष्टीने प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी अॅड कोमल ढोबळे यांनी घेतली व जबाबदारी घेतल्यानंतर त्यांनी समाजातील अनेक प्रश्नावर आवाज उठवण्याचा प्रयत्न केला,सोशलमिडीयात त्यांना मोठा प्रतिसाद मिळाला पुणे नाशिक महामार्गावरील टोलचा प्रश्न सोशलमिडीयात चांगला चर्चेला आला.

कर्मचाऱ्याला या प्रश्नावर माफीनामा द्यावा लागला.या संघटनेच्या माध्यमातून त्यामध्ये महिलांसाठी महिला मेळावा घेतला. महिलांना बचतीची सवय लागावी म्हणून त्यांना सावली फाउंडेशन च्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले. मंगळवेढा मध्ये अनु संध्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून मोफत सर्वरोग शिबीरातून तब्बल सहा हजार रुग्णांची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्यावर मोफत उपचार करण्याचे काम केले. वीज,पाणी,बार्टीचा प्रश्न,शिष्यवृत्ती,ऊस तोडणी वरील अन्यायाबाबत देखील त्यांनी आवाज उठवण्याचे काम केले त्यामुळे या संघटनेचा प्रभाव राज्यभर वाढू लागला व नवीन कार्यकर्ते देखील जोडले जाऊ लागले अशा परिस्थितीत युवकांची फळी देखील मजबूत करण्याच्या दृष्टीने याची जबाबदारी ढोबळे यांनी त्यांचे सुपुत्र अभिजीत ढोबळे यांच्यावर सोपवली आहे त्यामुळे दोघा बहीण-भावांना संघटनेच्या माध्यमातून त्यांच्या राजकीय नेतृत्वाला वाव मिळणार आहे त्यामुळे दोघे म्हणून बहुजन समाजातील प्रश्नांना आणखीन कशा पद्धतीने वाहू देतात.यावर त्यांचे राजकीय भविष्य अवलंबून आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com