बार्शी : गुळपोळीत वस्तीवर चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न अयशस्वी

ग्राम सुरक्षा दलाची सतर्कता
चोरी
चोरीsakal

बार्शी : गुळपोळी येथील वस्तीवरील घरामध्ये तिघे मित्र झोपले असताना दरवाजा तोडून चोरी करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला असून गावामध्ये सतर्क असलेल्या ग्रामसुरक्षा दलामुळे चोरटे पळून गेले.ग्रामसुरक्षा दलाचे पोलिस अधिकाऱ्यांसह ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

गुळपोळी येथील खंडू हनुमंत काळे गावातील शेतवस्तीवर त्यांचे कुटूंबासह राहणेस असून त्यांची आई मंदाकिनी काळे या आजारी असल्यामुळे आई व भाऊ पाडूरंग काळे बार्शी येथे रुग्णालयात गेले होते.

खंडू याने रात्री सोबत झोपण्यासाठी त्याचे मित्र समर्थ लंगोटे व प्रशांत राऊत यांना बोलावून तिघेजण वस्तीवर मुक्कामास होते.गुरुवारी रात्री दीडच्या सुमारास शेतवस्तीवर तीन ते चार अज्ञात चोरटे आले त्यांनी घराचे दरवाजावर लाथा मारून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा आवाज आल्यामुळे काळे व त्याचे मित्र जागे झाले.

समर्थ लंगोटे याच्या फोनवरुन गुळपोळी येथील पोलीस पाटील यांना फोन केला व पोलीस पाटील बाळकृष्ण पिसे यांनी 18002703600 या ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या क्रमांकावर फोन करताच पोलिस यंत्रणेसह गावातील नागरिक जागे झाले.

चोरी
चीनमधील रियल इस्टेटचा बुडबुडा

उपसरपंच निरंजन शांतीनाथ चिकणे,मेजर विशाल डोके,योगेश राऊत,ओंकार पाटील,वैजिनाथ काळे,राजेंद्र काळे,योगेश चिकणे,शरद माळी असे मदतीसाठी तात्काळ घटनास्थळी पोहचत असताना गावातून नागरिक वस्तीकडे येत असल्याचे पाहताच चोरटे अंधाराचा फायदा घेत पळून गेले.

तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी जायपत्रे,उपनिरीक्षक जाधव,हवालदार रियाज शेख,गोरख मेहेर,बळीराम बेदरे यांनी घटनास्थळ गाठले होते ग्रामसुरक्षा सदस्य घटनास्थळी तात्काळ पोहचण्यासाठी फोनव्दारे संपर्क करून वेळेत मदतीसाठी प्रयत्न केले.

चोरी
स्थानिक स्वराज्य निवडणुका पुढे ढकलणार?;पाहा व्हिडिओ

गुळपोळी गाव तालुका पोलीस ठाण्यापासून बावीस किलोमीटर अंतरावर आहे तेथे पोलिसांची मदत पोहचण्यासाठी कमीत-कमी अर्धा तास लागू शकतो परंतू ग्रामसुरक्षा यंत्रणेमुळे पाच मिनिटातच मदत पोहचली आहे.

"खंडू काळे यांचा वस्तीवरील घरात होणारा चोरीचा अनर्थ टळल्याने तालुका पोलीस ठाणे हद्दीतील सर्व गावातील ग्रामस्थांनी ग्रामसुरक्षा यंत्रणा सतर्क करावी अडचण असेल तर पोलिसांशी तात्काळ संपर्क साधावा माहिती घ्यावी."

- शिवाजी जायपत्रे, सहायक पोलिस निरीक्षक,तालुका पोलिस ठाणे बार्शी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com