Barshi Fire Accident : "परथ्या, मी आजोबाला बाहेर काढते, तू शेजाऱ्यांना बोलावून आण"

घराबाहेर गेलेला नातू वाचला, मात्र वृद्ध दाम्पत्याचा झोपडीत होरपळून मृत्यू
Barshi Fire Accident
Barshi Fire AccidentEsakal

वेळ सोमवारी पहाटे साडेतीनच्या दरम्यानची... आजीने चुलीवर पाणी तापवण्यासाठी ठेवले व नातवाला झोपेतून उठविले...नातू बाहेर रेडी सुटली म्हणून बांधायला गेला... मात्र मागे चुलीतील ठिणगीमुळे झोपडीला भीषण आग लागली आणि या आगीच्या भक्ष्यस्थानी आजी-आजोबा पडले... त्यातही आजी मोठमोठ्याने ओरडून नातवाला सांगू लागली, ‘परथ्या, पळ; झोपडीला आग लागली आहे. मी आजोबाला बाहेर काढते, तू जा आणि शेजारी राहणाऱ्यांना बोलावून आण.’ प्रथमेश शेजाऱ्यांना घेऊन येईपर्यंत आजी-आजोबांचा या भीषण आगीत होरपळून मृत्यू झालेला होता. ही हृदयद्रावक घटना बार्शी तालुक्यातील गाडेगाव येथील वस्तीवर आज (ता. १३) पहाटे घडली.

मंगेशच्या फिर्यादीनुसार, भीमराव पवार यांना नऊ मुली असून, सर्व विवाहित आहेत. पत्नी कमल, नातू प्रथमेश मोहिते (वय १२) यांच्यासह गाडेगाव येथील वस्तीवर झोपडीमध्ये तिघेजण वास्तव्यास होते. सोमवारी पहाटे साडेतीनच्या दरम्यान आजी कमल उठली आणि झोपडीमध्ये असलेल्या चुलीवर पाणी तापण्यासाठी ठेवले व आजीने प्रथमेशला झोपेतून उठवून ‘रेडी सुटली आहे ती बांध, अंघोळीला पाणी ठेवले आहे’, असे सांगितले.

Barshi Fire Accident
Devendra Fadanvis : पवारांपेक्षा ‘या’ नेत्याने सर्वात मोठा विश्वासघात केला; फडणविसांनी व्यक्त केली खदखद

त्यानंतर थोड्याच वेळात चुलीतील ठिणगी झोपडीच्या कुडावर पडल्याने आग लागली. त्यानंतर आजीने ‘परथ्या पळ; झोपडीला आग लागली आहे’ असे ओरडून सांगितले. त्यावेळी प्रथमेश बाहेर आला व बाहेर ठेवलेल्या बॅरलमधील पाणी मारून आग विझवण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र, आगीने रौद्ररूप धारण केले होते. तरीही आजी म्हणाली, ‘मी आजोबाला बाहेर काढते, तू जा आणि शेजारी राहणाऱ्यांना बोलावून आण.’ त्यावेळी प्रथमेश पळत जाऊन जमीर मुलाणी, दिलावर मुलाणी यांना घेऊन आला. तोपर्यंत पूर्ण झोपडी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती.

Barshi Fire Accident
Pulwama Attack : आजच चार वर्षांपूर्वी झाला होता भ्याड हल्ला; त्या ४० वीरांना देश वाहतोय श्रध्दांजली

आगीत अडकलेली आजी पतीला बाहेर काढत होती. मात्र, आगीच्या रौद्ररूपापुढे पतीला वाचविण्याचा संघर्ष अपयशी ठरला आणि दोघांचाही होरपळून त्यात मृत्यू झाला. झोपडीशेजारी असलेल्या गोठ्यालाही आग लागून बांधलेल्या अवस्थेतील तीन शेळ्या जागीच मृत्युमुखी पडल्या होत्या. प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले होते. या हृदयद्रावक घटनेने अनेकांना अश्रू आनवर झाले होते. घटनेनंतर गावावर शोककळा पसरली होती. पोलिस हवालदार जनार्दन शिरसट तपास करीत आहेत.

Barshi Fire Accident
Pune Bypoll Election : "टिळकांची जागा घेण्यासाठी भाजपचे इच्छूक उमेदवार गिधाडासारखी वाट बघत होते"

दीड एकर शेती अन्‌ नऊ मुली

गाडेगाव येथील वस्तीवर राहणाऱ्या वृद्ध पवार दाम्पत्याला दीड एकर शेती आहे. ते आपल्या याच शेतात झोपडी करून वास्तव्यास होते. त्यांना नऊ मुली असून मुलगा नाही. त्यामुळे हे दाम्पत्य आपल्या नातवासोबत राहत होते. सोमवारची पहाट त्यांच्यासाठी काळ घेऊन आली होती. दररोजच्या प्रमाणे कमला यांनी अंघोळीसाठी पाणी तापवायला ठेवले. मात्र चुलीतील ठिणगी कुडावर पडल्याने झोपडीला भीषण आग लागली. भीमराव पवार यांचे वय ९५ असल्याने तसेच त्यांना हलचाल करता येत नव्हती. त्यामुळे या भीषण आगीतून त्यांना बाहेर काढणे कमला पवार यांना शक्य झाले नाही. यात दोघांचाही होरपळून मृत्यू झाला. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com