
Solapur : दोन वर्षानंतर बंद भोसे पाणी योजना समाधान आवताडे यांच्या पाठपुराव्याने आज कार्यान्वित
मंगळवेढा : वीज बिल न भरल्यामुळे बंद असलेली तालुक्यातील 39 गावाची भोसे प्रादेशीक पाणीपुरवठा योजना समाधान आवताडे यांच्या पाठपुराव्याने आज कार्यान्वीत झाली असून जुनोनी येथील जलशुध्दीकरण केंद्रात या योजनेचे पाणी पोहचले आहे.
तालुक्याच्या दक्षिण भागातील जनतेच्या पिण्याच्या पाण्यासाठी वरदायीनी असलेली लोकवर्गणीची अट रदद करुन स्व आ.भारत भालके यांनी हो योजना राबविली पण गेल्या दोन वर्षापासून 1 कोटी 17 लाखाचे वीज बिल न भरल्यामुळे बंद होती.
यामध्ये 39 गावाच्या ग्रामपंचायतीकडून येणेबाकी 40 लाख होते यातील तफावत असलेली रक्कम कोण भरणार हा प्रश्न अनुत्तरीत होता.तर 6 गावाला पाणीच मिळाले नसल्याच्या तक्रारी होत्या यावरुन आ समाधान आवताडे पंचायतराज समितीच्या पाहणी दौय्रात या योजनेची तीव्रता दाखवत लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयात दोन वेळा,तर मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सोलापूर येथेही बैठक घेतली.
आवताडे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्न उपस्थित करुन उन्हाळयापुर्वी या भागातील तीव्रतेची जाणीव शासनाला करुन दिली.जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही प्रयत्न केले.बय्राच ग्रामपंचायतीने पाणी मिळाले नाही व अन्य कारणावरुन या योजनेची पाणी पटटी भरण्यास चालढकल केल्याने शासनाकडून ग्रामपंचायतीला दिले जाणारे दोन वर्षातील मुद्रांक अनुदानातून या गावातून 40 लाख 23 हजार 986 रु इतकी रक्कम गटविकास अधिकारी यांनी शिखर समितीकडे दिली या रकमेतून 35 लाख इतके वीज बिल भरण्यात आले उचेठाण जलशुध्दीकरण केंद्रातून पाणी दोन दिवसापुर्वी सुरु करण्यात आले.
समाधान आवताडे यांनी सातत्याने वेगवेगळया माध्यमातून पाठपुरावा करुन योजना सुरु करण्यात यश मिळविले.यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा खात्याचे अभियंता व गटविकास अधिकारी शिवाजी पाटील यांचे योगदान महत्वाचे ठरले
- प्रदीप खांडेकर सदस्य जिल्हा नियोजन मंडळ
या योजनेचे पाणी जुनोनी जलशुध्दीकरण केद्रांत पोहचले असून उदया गोणेवाडी झोनचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे उर्वरित गावांना लवकरच पाणी दिले जाईल यापुढील पाणी पटटी वेळेत भरले तर पुढे पाणीपुरवठयात सातत्य राहील
- जमीर मुलाणी सचिव शिखर समिती भोसे प्रादेशीक पाणी पुरवठा योजना