"पालकमंत्र्यांनी बारामतीच्या इनामदारीचा पट्टा काढून सोलापूरकरांची सेवा करावी !'

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी टीका केली
Deshmukh_Bharne
Deshmukh_BharneCanva

पंढरपूर (सोलापूर) : सांडपाण्याच्या (Sewage) गोंडस नावाखाली उजनीतील (Ujani Dam) 5 टीएमसी पाणी इंदापूरला पळवण्याचा घाट घातला गेला आहे, अशी टीका करत, बारामतीच्या इनामदारीचा गळ्यातील पट्टा काढून सोलापूरकरांची सेवा करावी, असा पलटवार भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख (BJP district president Shrikant Deshmukh) यांनी सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे (Guardian Minister of Solapur Dattatraya Bharne) यांच्यावर केला आहे. (BJP district president Shrikant Deshmukh criticized Guardian Minister Dattatraya Bharane)

Deshmukh_Bharne
लोकप्रतिनिधींचा अपमान सोलापूरकर सहन कसा करतील?

सोलापूर जिल्ह्यातील भाजप आमदार आणि खासदारांनी पालकमंत्री आणि राज्य सरकारच्या निष्क्रियतेविरोधात अलीकडेच आंदोलन केले होते. त्यावर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी "नौटंकी न करता, कोरोना काळात कृतिशील सहभाग नोंदवावा' असे म्हणत भाजप आमदार व खासदारांना फटकारले होते. त्यावर आज भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी "पालकमंत्र्यांनी बारामतीकरांच्या इनामदाराची गळ्यातील पट्टा काढून सोलापूरचे हित जोपासावे' असे म्हणत पालकमंत्र्यांवर पलटवार केला.

श्रीकांत देशमुख म्हणाले की, कोरोनाचा अति फैलाव झालेले 90 जिल्हे आहेत. त्यात सोलापूर जिल्ह्याचा नंबर लागतो. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्याची जबाबदारी जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने दत्तात्रय भरणे यांची आहे. परंतु गेल्या दीड महिन्यामध्ये पालकमंत्र्यांनी सोलापूर जिल्ह्यात आढावा बैठक तर सोडाच साधी ऑनलाइन व्हर्च्युअल बैठक सुद्धा घेतली नाही. दरम्यान, पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा पराभव झाल्यानंतर पालकमंत्र्यांनी सोलापूरची आढावा बैठक घेतली. त्यांना हे उशिरा सुचलेले शहाणपण म्हणावे लागेल.

Deshmukh_Bharne
उजनीत सांडपाणीच येत नाही ! पेडगाव येथील बंधाऱ्यावर केली शिवाजी बंडगरांनी पाहणी

सोलापूर जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर असतानाही राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी पुण्यासह शेजारच्या जिल्ह्यातील रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन साठा, कोरोना लस पळविली आहे. सोलापूर जिल्हा हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आहे. जिल्ह्यात दोन खासदार आणि आठ आमदार आहेत. याचा राग मनात धरूनच राष्ट्रवादीचे पालकमंत्री सोलापूर जिल्ह्यावर अन्याय करीत असल्याचा आरोपही देशमुख यांनी केला आहे.

कोरोना संकट काळात सोलापूर जिल्ह्याला न्याय मिळावा, या मागणीसाठी दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय जनता पक्षाच्या आमदार व खासदारांनी राज्य सरकारच्या विरोधात लाक्षणिक उपोषण केले. केंद्राची सोलापूर जिल्ह्याच्या हिश्‍श्‍याची आलेली मदत पुण्यातून राजकीय ताकदीने अन्यत्र पळवली जात आहे. राज्याला मदत केंद्राची आणि जाहिरात राज्य सरकारच्या कामाची, अशी परिस्थिती पाहावयास मिळत आहे. कमकुवत असलेला बारामती लोकसभा मतदारसंघ मजबूत करण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांच्या साथीने सांडपाण्याच्या गोंडस नावाखाली उजनीतून पाच टीएमसी पाणी चोरून नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. भविष्यात सोलापूर जिल्ह्यातील ऊस, फळबागा शेती उद्‌ध्वस्त करून जिल्ह्याचे वाळवंट करण्याचा पालकमंत्र्यांचा डाव असल्याचा आरोपही देशमुख यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com