Solapur News : मोहोळ शहरातील पोलीस वसाहतीत स्फोट; नागरिकांमध्ये घबराट

अचानक एका इमारतीच्या खिडकी जवळ मोठा स्फोट
Blast in Police Colony in Mohol City Panic among citizens solapur crime
Blast in Police Colony in Mohol City Panic among citizens solapur crimesakal

मोहोळ : शहरात सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या जुन्या पोलीस वसाहतीत शुक्रवारी सायंकाळी अचानक स्फोट झाला मात्र स्फोट कशाचा व कशाने झाला हे समजू शकले नाही. परिसरातील नागरिकांमध्ये घाबरट पसरली आहे.

मोहोळ शहरात सोलापूर- पुणे महामार्गा नजीक जुनी पोलीस वसाहत आहे. सध्या त्या वसाहतीचे पाडकाम व नवीन बांधकाम सुरू आहे. काम सुरू असताना अचानक एका इमारतीच्या खिडकी जवळ मोठा स्फोट झाला. त्यामुळे परिसरातील घरावर, दुकानावर, तसेच पोलीस वसाहती शेजारी असलेल्या भारत संचार निगमच्या कार्यालयावर लहान दगड गोटे पडले.

स्फोटाची तीव्रता कमी असल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही तसेच कोणी जखमीही झाले नाही. दरम्यान ही माहिती मिळताच मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी पोलीस वसाहतीत जाऊन पाहणी केली व नागरिकांनी घाबरू नये असे आवाहन केले.

दरम्यान पोलीस निरीक्षक सायकर यांनी सोलापूर येथील बॉम्ब शोधक पथकाला पाचारण केले, त्यांनी येऊन पाहणी केली मात्र नेमका स्फोट कशाचा व कशाने झाला हे समजले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com