Accident News : पंढरपूर- मोहोळ पालखी मार्गावर कार-मोटारसायकल अपघात; एकाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

car and two wheeler accident one killed police hospital solapur mohol

Accident News : पंढरपूर- मोहोळ पालखी मार्गावर कार-मोटारसायकल अपघात; एकाचा मृत्यू

मोहोळ : एका कार ने मोटरसायकलला पाठीमागून धडक देऊन झालेल्या अपघातात मोटार सायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात पंढरपूर- मोहोळ पालखी मार्गावरील पेनुर जवळील माने वस्ती जवळ मंगळवार ता 23 रोजी सायंकाळी सात वाजता झाला.

धनाजी दत्तू माळी वय 42 रा शेटफळ ता मोहोळ असे मृताचे नाव आहे. अपघात होताच कार पंढरपूरच्या दिशेने खबर न देताच भरधाव निघून गेली. मोहोळ पोलिसां कडून मिळालेल्या माहिती नुसार, मृत धनाजी माळी हे त्यांच्या मोटरसायकल नंबर एम एच 12 एचपी 5125 वरून पाटकुलहुन शेटफळ कडे जात होते.

ते माने वस्ती जवळ येताच पाठीमागून भरधाव येणाऱ्या कार क्र एम एच 12/ जे झेड 3041 ने जोराची धडक दिली. अपघात होताच कारचालक तसाच पुढे पंढरपुरच्या दिशेने निघून गेला व मगरवाडी फाट्याजवळ कार उभी करून तिथून निघून गेला. या घटनेची फिर्याद उत्तम नवनाथ डोके वय 42 रा पेनुर यानी मोहोळ पोलिसात दिली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जोतिबा पवार करीत आहेत.

टॅग्स :Solapuraccident