श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त वाहतूक मार्गात बदल! मिरवणूक मार्ग, होम मैदान ५ दिवस ‘नो पार्किंग झोन’

ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी नवे आदेश काढले आहेत. त्यानुसार १३ ते १७ जानेवारी दरम्यान नंदीध्वज मार्गावर आणि श्री सिद्धेश्वर मंदिर परिसर, श्री मल्लिकार्जुन मंदिर, संमती कट्टा, श्री रेवणसिद्धेश्वर मंदिर व बाजार परिसरात ‘नो पार्किंग झोन’ असणार आहे.
वाहतुक मार्गात बदल
वाहतुक मार्गात बदल sakal media

सोलापूर : ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी नवे आदेश काढले आहेत. त्यानुसार १३ ते १७ जानेवारी दरम्यान नंदीध्वज मार्गावर आणि श्री सिद्धेश्वर मंदिर परिसर, श्री मल्लिकार्जुन मंदिर, संमती कट्टा, श्री रेवणसिद्धेश्वर मंदिर व बाजार परिसरात ‘नो पार्किंग झोन’ असणार आहे. होम मैदानावर १५ जानेवारीला होम विधी सोहळा तर १६ जानेवारीला शोभेचे दारूकाम होईल. त्यावेळी हा आदेश लागू असणार आहे. या काळात वाहतूक मार्गातही बदल करण्यात आला आहे.

श्री सिद्धेश्वर यात्रेसाठी महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगण येथून जवळपास तीन ते चार लाख भाविक येतात. कोरोनाच्या दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच यात्रा निर्बंधमुक्त पार पडत असल्याने भाविकांची गर्दी जास्त होईल, असा पोलिसांचा अंदाज आहे. दरम्यान, नंदीध्वजांच्या मिरवणुकीला हिरेहब्बू मठातून सुरवात होते. बाबा कादरी मशीद, डॉ. चिडगुपकर यांचे घर, श्री. केळकर वकिलांचे घर, दाते यांचे श्री गणपती मंदिर, हाजीभाई चौक, खाटीक मशीद, कसबा चौक, माणिक चौक, विजापूर वेस, वडतिले यांचे दुकान, घिसाड गल्ली, पंचकट्टा आणि रिपन हॉल येथून श्री सिद्धेश्वर मंदिर असा नंदीध्वज मिरवणुकीचा मार्ग असतो. तसेच नंदीध्वज ६८ लिंग प्रदक्षिणा देखील असते. त्यामुळे मिरवणुकीवेळी अत्यावश्यक वाहने वगळता अन्य कोणत्याही वाहनाला प्रवेश असणार नाही. १३ ते १७ जानेवारी दरम्यान हा आदेश लागू असणार आहे. आदेशाचा भंग केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस आयुक्तांनी दिला आहे.

वाहतूक मार्गात असा असेल बदल

ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेला कोणताही अडथळा होऊ नये म्हणून सात मार्गांवरील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. १३ ते १७ जानेवारी या काळात हा बदल असणार आहे. विजापूर वेस ते पंचकट्टा आणि लक्ष्मी मार्केट ते पंचकट्टा या मार्गावरील वाहतूक विजापूर वेस ते बेगमपेठ पोलिस चौकीमार्गे अशी जाईल. भारतीय स्टेट बॅंक ट्रेझरी शाखा (पूजा ऑफिस स्टेशनरी दुकान) ते पंचकट्टा या मार्गावरील वाहतूक पूनम चौक ते बेगमपेठ पोलिस चौकीमार्गे पुढे जाईल. भारतीय स्टेट बॅंक ट्रेझरी शाखा ते पार्क चौक या मार्गावरील वाहतूक पूनम चौक, रंगभवन चौक, सात रस्ता, जुना एम्प्लॉयमेंट चौक, डफरीन चौक, पार्क चौक या मार्गावरून वळविण्यात येणार आहे. तसेच मार्केट पोलिस चौकी ते पंचकट्टा, पार्क चौक ते मार्केट चौकी, ज्ञानप्रबोधिनी प्रशाला ते फडकुले सभागृह हे मार्ग निर्बंध काळात वाहतुकीसाठी बंद राहतील, असेही पोलिस आयुक्त डॉ. माने यांनी आदेशातून स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com