प्राध्यापकाकडून मुलाचे शारीरिक शोषण

मंगळवेढ्यातील प्रकार; शिकवणीच्या निमित्ताने अत्याचार
child abuse
child abusesakal

मंगळवेढा : अल्पवयीन शाळकरी मुलास अभ्यासाच्या निमित्ताने घरी बोलावून त्याच्यासोबत अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी येथील एका नामांकित महाविद्यालयातील प्राध्यापकाविरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. प्रा. हरून सय्यदनूर मुल्ला (रा. नर्मदा पार्क) असे गुन्हा दाखल झालेल्या प्राध्यापकाचे नाव आहे.

child abuse
Budget 2022 : पेगॅसिसवर स्वतंत्र चर्चेला वावच नाही - Govt

या प्रकरणाची फिर्याद पीडित मुलाच्या वडिलांनी मंगळवेढा पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. पीडित मुलगा हा मोहोळ तालुक्‍यातील असून २०१२ साली दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याला महाविद्यालयीन शिक्षणासाठी मंगळवेढा येथे पाठविण्यात आले होते. मंगळवेढा येथे चांगले शिक्षण मिळत असून आपल्या मुलाला शिक्षणासाठी येथे पाठवावे म्हणून हरुन मुल्ला पीडित मुलाच्या घरी गेला होता. त्याच्या इच्छेनुसार पीडित मुलाच्या वडिलांनी आपल्या पाल्यास २०१३ ते २०१७ या कालावधीत महाविद्यालयीन शिक्षणासाठी मंगळवेढा येथे रुम भाड्याने करून ठवले. दरम्यान, पीडित मुलाला शाळा सुटल्यानंतर शिकवणीसाठी प्राध्यापकाच्या घरी जात होता.

child abuse
नवाब मलिकांच्या अडचणी वाढणार? SC आयोगानं दिले 'हे' आदेश

या काळात प्राध्यापकाने मुलावर अत्याचार करत त्याच्यासोबत अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवले. त्यामुळे २०१७ नंतर पीडित मुलगा वेड्यासारखा वागू लागला. तसेच तो मानसिकदृष्ट्या खचून गेला होता. वाघोली येथील खाजगी डॉक्‍टरकडे त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर संबंधित डॉक्‍टरने सदरचा प्रकार मुलाच्या वडिलांच्या कानावर घातला. यानंतर पीडिताच्या वडिलांना धक्काच बसला. त्यांना नातेवाईकांनी धीर दिल्यानंतर संबंधित प्राध्यापकाविरुद्ध पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. प्राध्यापकाला पोलिसांनी अटक केली असून पंढरपूर येथील न्यायालयात हजर केले असता न्यायाधीस कमल बोरा यांनी त्याला ता. २ पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com