ration shops
ration shops sakal

रेशन दुकानांतून निकृष्ट गव्हाचा पुरवठा

रेशन दुकानांतून निकृष्ट गव्हाचा पुरवठा

चिपळूण: शासनमान्य रास्त धान्य दुकानांच्या माध्यमातून गरिबांच्या पदरात खराब गहू घातला जात आहे. एप्रिल महिन्यातील धान्यातून तांदळाचे प्रमाण कमी करून त्या जागी गहू दिला जात आहे. तसेच मोफत धान्य गायब झाले असून मे महिन्याच्या धान्याचा अजून पत्ता नसल्याने शिधापत्रिकाधारकांचे लक्ष दुकानांकडे लागले आहे. सध्या रास्त धान्य दुकानांमधून अंत्योदय लाभार्थ्यांच्या दरमहा ३५ किलो धान्य दिले जाते, तर पात्र लाभार्थ्यांना युनिटप्रमाणे धान्य मिळते. कोरोना आल्यापासून मोफत दिले जात आहे व रास्त धान्य दुकानांमध्ये कमी दरात धान्य मिळत असले तरी त्याचा दर्जा चांगला नाही. एप्रिल महिन्यापासून धान्याच्या प्रमाणात बदल करण्यात आला असून तांदळाचे प्रमाण कमी करून त्या जागी गहू वाढवण्यात आला आहे. पावसाळा काही दिवसावर येऊन ठेपला आहे. सप्टेंबर महिन्यापर्यंत मोफत धान्य देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. असे असताना एप्रिल महिन्याचे मोफत धान्य दुकानांमध्ये उपलब्ध झालेले नाही. ते मिळेल की नाही, अशी भीती शिधापत्रिकाधारकांना वाटत आहे.

मे अर्धा महिना संपत आला तरी..

तसेच काही महिन्यांपूर्वी रत्नागिरी येथे हमाल कर्मचाऱ्यांनी काही दिवस काम बंद ठेवले होते. त्याचा परिणाम जाणवत आहे. मे अर्धा महिना संपत आला तरी अजूनही एप्रिल महिन्याचे धान्य वितरण सुरू आहे. त्यामुळे मे महिन्यात धान्य मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

केंद्र सरकार गरिबांना मोफत तर काहींना अल्प दरात धान्य पुरवते, ही चांगली बाब असली तरी त्या धान्याचा दर्जा चांगला असावा, अशी माफक अपेक्षा आहे. गरिबांना मिळणाऱ्या वस्तूंचा काळाबाजार होऊ नये. याकडे लोकप्रतिनिधी आणि शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

- मंगेश शिंदे, चिपळूण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com