चोखामेळानगर जिल्हा परिषद व पंचायत समिती गणावर हरकत निकालाकडे लक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur ZP

चोखामेळानगर जिल्हा परिषद व पंचायत समिती गणावर हरकत निकालाकडे लक्ष

मंगळवेढा : आगामी जि प व पंचायत समिती निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर महसूल खात्याने काढलेल्या आरक्षण सोडतीतील चोखामेळानगर जि प गट व पंचायत समिती गणाच्या आरक्षण सोडतीवर भाजप पदाधिकारी आंबा लांडे यांनी हरकती घेतली या हरकतीवर काय निर्णय होणार याकडे लक्ष लागले आहे.

वाढत्या लोकसंख्येनुसार तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गणाची पुर्नरचना करण्यात आली.त्यामुळे एका जिल्हा परिषद गटासह पंचायत समितीच्या दोन गणात वाढ झाली.पंचायत समिती गणासाठी मंगळवेढयातील तहसील कार्यालयात तर जिल्हा परिषदेसाठी सोलापूरात आरक्षण सोडत काढण्यात आली.या सोडतीत चोखोमळा नगर पं.स गण इतर मागासवर्गीय महिलेसाठी तर जि प गट अनु जाती महिलेसाठी राखीव निघाला यावर भाजपाचे पदाधिकारी आबा लांडे यांनी हरकत घेतली असून हे आरक्षण बदलून मिळण्याची मागणी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे केली त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे.

की चोखामेळानगर जि प गटातील भाळवणी,तळसंगी,फटेवाडी,हिवरगाव,जालीहाळ,खोमनाळ ही गावे हुलजंती गटात होतील यापुर्वी या गटात अनु जाती महिला हे आरक्षण होते तर पाठखळ,मेटकरवाडी,डोंगरगाव,कचरेवाडी,गणेशवाडी,अकोला,देगाव,घरनिकी,या गावांनी लक्ष्मी दहिवडी जि प गटातून अनु.जाती आरक्षणास उपभोग घेतला तर चोखामेळा नगर पंचायत समिती गणाचे 2017 पूर्वी डोंगरगाव असे नाव असून 2002 साली इतर मागासवर्गीय महिला असे आरक्षण होते.तर लक्ष्मी दहीवडी गणातील गणेशवाडी अकोला घरनिकी देगाव चार गावे यांनी इतर मागासवर्गीय महिला हे आरक्षण उपभोगले आहे.

राज्य निवडणूक आगोगाचा 9/5/2022 च्या आदेशानुसार एखादा गण नवीन जुना हे ठरविण्यासाठी त्या लगतच्या गावाच्या जनगणनेनुसार एकून गावाच्या लोकसंख्येतील 50 टक्के पेक्षा जास्त होत असेल तो आणि त्या गणात पुर्वी आरक्षण झाले असेल तो मुळ गट मानण्यात येईल व त्या निवडणूक गणात आरक्षण टाकता येणार नाही याचा आधार घेत आबा लांडे हरकत घेतली.आता जिल्हाधिकरी काय निर्णय याकडे लक्ष लागले त्यानंतर या गटातील राजकीय हालचाली गतीमान होणार आहेत.

Web Title: Chokhamela Nagar Zilla Parishad Panchayat Samiti Ganization Objection Result

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top