ब्रेकिंग! सोलापुरातील कोरोना बाधित महिलेचा मृत्यू

Corona patient woman death in Solapur
Corona patient woman death in Solapur

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोनाबाधित झालेल्या महिलेचा मृत्यू झाला असून सोलापुरातील मृत्यू पावलेल्या एकूण व्यक्तींची संख्या सात झाली आहे अशी माहिती सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. 
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार रविवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत सोलापूर शहर व जिल्ह्यातील 128 जणांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे त्यांनी सांगितले. रविवारी सायंकाळी पाचपर्यंत सोलापुरातील कोरोना बाधित मृत व्यक्तींची संख्या ही सहा होती यामध्ये एका महिलेची भर पडली असून सोलापुरातील कोरोना बाधित मृत व्यक्तींची संख्या आता सात झाली आहे. पालकमंत्री भरणे म्हणाले, राज्य सरकारमधील अनुभवी मंत्री जयंत पाटील यांनी सोलापूरचा दौरा करावा अशी विनंती मी त्यांना केली होती.  त्यांच्या अनुभवाचा फायदा सोलापूर जिल्ह्यासाठी नक्कीच होईल. येत्या आठ दिवसात सोलापुरातील कोरोना बाधितची परिस्थिती नक्की बदलेल त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजना केल्या जात असल्याची माहितीही पालकमंत्री भरणे यांनी दिली. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी देखील सोलापूरचा दौरा करावा यासाठी आपण त्यांना विनंती केली असून लवकरच आरोग्य मंत्री टोपे सोलापूरच्या दौऱ्यावर येतील असा विश्वासही पालकमंत्री भरणे यांनी व्यक्त केला. सोलापूर शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून जिल्हा प्रशासनाच्यावतीने व सरकारच्यावतीने सोलापूर शहरावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. सोलापुरात सध्या नव्याने सापडत असलेले कोरोनाबाधित हे प्रतिबंधित क्षेत्रातील आहेत. नव्याने सापडणारे रुग्ण यापूर्वी आढळलेल्या कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कातील आहेत. सोलापूरकरांनी घाबरू नये,  शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन पालकमंत्री भरणे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com