"घरबसल्या कोरोनाला हरवा !' सोशल मीडियावर व्हायरल मेसेजेस; डॉक्‍टरांचा सावध इशारा

सोशल मीडियावर कोरोनावरील घरगुती उपयांचा होतोय चुकीचा प्रसार
Corona_Media
Corona_MediaCanva

सांगोला (सोलापूर) : सध्या सर्वत्र कोरोना विषाणूचा (Corona Virus) संसर्ग दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने कोरोना रुग्णांना उपचारासाठी बेडही मिळणे मुश्‍किलीचे झाले आहे. संपूर्ण आरोग्य यंत्रणेवर ताण आला असताना, सध्या कोरोना व त्यावरील विविध उपाय, घरबसल्या कोरोनाला कसे हरवता येईल, या आजारापासून आपल्याला संरक्षण कसे मिळवता येईल, हा संसर्ग होण्याअगोदर व झाल्यानंतर कोणते घरगुती उपाय केले जावेत, त्यासाठी विविध घरगुती पदार्थांद्वारे (काढा) आजार बरा कसा होईल असे नानाविध उपाय सध्या सोशल मीडियाद्वारे (Social Media) फिरू लागले आहेत. या संकटात आरोग्य यंत्रणा हतबल झालेली असतानाच काहीजण काही घरगुती उपाय करून या उपायांनी कोरोना बरा होणारच असल्याबाबत ठामपणे सोशल मीडियाद्वारे सांगत आहेत. (Corona home solutions are being misrepresented on social media)

दिवसेंदिवस कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे अनेक कोरोना रुग्णांना उपचारही मिळू शकत नाहीत. अनेक अत्यावश्‍यक रुग्णांना ऑक्‍सिजन अभावी आपले प्राण गमवावे लागत आहेत. त्यामुळे या महामारीचे संकट भयंकर असतानाच सोशल मीडियामध्ये सध्या हा संसर्ग होऊ नये किंवा झाल्यानंतर कोणते उपाय करावेत यासाठी विविध उपाययोजना सांगण्यात येत आहेत. सोशल मीडियाद्वारे कोरोना संसर्ग झाल्यानंतर घरातील विविध मसाल्याचे पदार्थ किंवा वनस्पतीच्या द्वारे विविध औषध निर्मिती तसेच वेगवेगळ्या प्रकारचा काढा बनवून कोरोनापासून संरक्षण कसे मिळवता येईल यासाठी उपाय सांगितले जात आहेत.

अनेक जण हा संसर्ग रोखण्यासाठी हे उपाय करीत असतानाच काहींना याचे शारीरिक दुष्परिणामही जाणवू लागले आहेत. त्यामुळे नागरिकांना सोशल मीडियाद्वारे फिरणाऱ्या विविध उपाय करावेत का नकोत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. काहीजण असे उपाय केल्याने आराम मिळत असल्याचे सांगत आहेत तर काहींना त्यांच्या शारीरिक परिणामांचा सामना करावा लागत आहे. सोशल मीडियाद्वारे काही उपाय केले तर कोरोना होणारच नसल्याचे ठामपणे सांगतले जात आहे. तर अनेकजण असा काढा करून त्याचे सेवन करीत आहेत तर काहीजण शंका उपस्थित करीत आहेत.

Corona_Media
कोरोना विकत घेण्यासाठीच भरला बाजार जणू ! प्रशासन आदेश काढून मोकळे; कोणालाच नाही गांभीर्य

घरगुती काढ्याचा सर्रास होतोय वापर

कोरोना महामारीच्या काळात शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, फुफ्फुसाचे संरक्षण करण्यासाठी, शरीरातील कफ बाहेर काढण्यासाठी, शरीरातील ऑक्‍सिजनची लेव्हल वाढवण्यासाठी विविध प्रकारच्या काढ्यांचा वापर शहर व ग्रामीण भागातील नागरिक सध्या करत असल्याचे पाहावयास मिळत आहे.

योगसने, प्राणायाम करण्याकडे नागरिकांचा वाढता कल

जसे कोरोनाचे संकट वाढत चालले आहे, तसे यापासून संरक्षण मिळविण्यासाठी, आपली प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अनेकजण योगासने, प्राणायाम करू लागले आहेत. याची माहिती मिळवण्यासाठी सोशल मीडियाद्वारे धडे घेऊन व्यायामाबरोबरच योगासने- प्राणायाम करण्यासाठी लोकांचा कल वाढू लागला आहे.

Corona_Media
...तर निकाल वेगळा दिसला असता ! ज्येष्ठांच्या सूचनांकडे दुर्लक्ष अन्‌ नडला अतिआत्मविश्वास

नागरिकांनी नियमित व्यायाम, संतुलित आहाराबरोबरच फळांचे सेवन करावे. कोणत्याही प्रकारचा काढा घेण्याअगोदर डॉक्‍टरांचा सल्ला घेतला पाहिजे. कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याचे मूळ कारण नागरिक आजार अंगावर काढत आहेत. लक्षणे दिसल्यास नागरिकांनी त्वरित डॉक्‍टरांशी संपर्क करावा.

- डॉ. सीमा दोडमनी, तालुका वैद्यकीय अधिकारी, सांगोला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com