कोरोनाचा सर्वाधिक धोका 'या' व्यक्‍तींनाच ! 30 ते 50 वयाच्या व्यक्‍ती सर्वाधिक पॉझिटिव्ह 

1Corona_93_0.jpg
1Corona_93_0.jpg

सोलापूर : आरोग्य विभागाने आता मृत्यू व पॉझिटिव्ह रुग्णांचे मूल्यमापन करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यानुसार राज्यातील कोरोना मृतांमध्ये 70 टक्‍के रुग्णांना पूर्वीचे गंभीर आजार असलेले रुग्ण असल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील मृतांमध्ये उच्च रक्‍तदाब, मधुमेह अथवा दोन्ही आजार असलेल्यांसह हृदयरोग, किडनी व फुफ्फुसाचे आजार असलेल्या तब्बल अकराशे रुग्णांचा समावेश आहे.

शहरातील वयोगटानुसार रूग्ण व मृत्यू 
वयोगट         रुग्ण         मृत्यू 
0 ते 15           1019        1 
16 ते 30         2766        20 
31 ते 50         4635        92 
51 ते 60         2270       144 
60 वर्षांवरील    2,522     419 
एकूण            13,212     676 
 

सोलापूर शहर-जिल्ह्यातील आतापर्यंत 55 हजार 51 व्यक्‍तींना कोरोनाची बाधा झाली असून त्यापैकी एक हजार 875 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 24 ते 48 तासांतील म्हणजेच वेळेत उपचार न घेतल्याने 507 जणांचा मृत्यू झाल्याचा अहवाल महापालिका व जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने तयार केला आहे. तर 48 ते 72 तास आणि तीन ते सात दिवसांमध्ये मृत्यू झालेल्यांचीही संख्या सातशेपर्यंत आहे. कोरोनामुळे कुटुंबातील कर्त्या व्यक्‍तीवरच घाला घातला असून पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये व मृतांमध्ये 31 ते 60 या वयोगटातील सर्वाधिक व्यक्‍तींचा समावेश आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढू लागली असून मृत्यूदरही पुन्हा जोर धरू लागला आहे. मृत्यू होणाऱ्या अथवा पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण विविध कामानिमित्त सातत्याने घराबाहेर पडणारेच आहेत. दुसरीकडे कुटुंबातील तरुण व्यक्‍तीच्या संपर्कात येऊन बाधित होणारेही लक्षणीय आहेत. तर त्या कुटुंबातील गंभीर आजार असलेल्या व्यक्‍तीही संपर्कात येऊन कोरोनाचे बळी ठरत असल्याचीही बाब या मूल्यमापनातून समोर आली आहे. दरम्यान, आता 45 ते 60 वर्षांच्या को-मॉर्बिड रुग्णांसह 60 वर्षांवरील ज्येष्ठांना लस टोचली जात आहे. सोलापूरसह राज्यातील सुमारे 35 लाख व्यक्‍तींनी तिसऱ्या टप्प्यात लस टोचून घेतल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली. 

शहर-जिल्ह्यातील आजारनिहाय मृत्यू 
आजार                               मृत्यू
उच्च रक्‍तदाब                      196
मधुमेह                                238
रक्‍तदाब व मधुमेह                183
हृदयरोगसह अन्य आजार        52
रक्‍तदाब व ह्दयरोग               37
ह्दयरोग                               66
किडनीचे आजार                    59
फुफ्फुसाचे आजार, दमा          30
लठ्ठपणा                                32
रोगप्रतिकारक शक्‍तीच नाही       2
60 वर्षांवरील                     1,248
एकूण                              1,875

मृत्यूची कारणे अन्‌ उपाययोजना 

  • संशयित असतानाही वेळेत घेतला नाही उपचार; वेळेत उपचार करा अन्‌ जीव वाचवा 
  • बोलताना अंतर न ठेवल्याने संपर्कातून झाला बाधित; सोशल डिस्टन्सिंगचे करा पालन 
  • मित्र, नातेवाईकाशी बोलताना मास्क काढला अन्‌ कोरोना झाला; नियमित मास्क वापरावा 
  • गंभीर आजार असतानाही वेळेत घेतले नाहीत उपचार; पूर्वीच्या आजारावर वेळेत घ्या उपचार 
  • गर्दीच्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन; शक्‍यतो गर्दीत जाणे व दूरवरील प्रवास टाळावा 

ग्रामीणमधील रुग्ण व मृत्यू 
वयोगट         रूग्ण         मृत्यू
0 ते 10         1,688          2
11 ते 20        3,977         4
21 ते 30        8,036        13
31 ते 40        8,517        36
41 ते 50        6,857       103
51 ते 60        5,416        211
60 वर्षांवरील   7,348       830
एकूण            41,839   1,199

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com