चार महिन्यानंतर जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी! सक्रिय रुग्णांची दोनशेकडे वाटचाल

कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावरील सोलापूर जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. बहुतेक रुग्ण लक्षणे नसलेले असल्याने प्रशासन रुग्णवाढीकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे चित्र आहे. शनिवारी (ता. २) शहरात २८ तर ग्रामीणमध्ये १८ नवीन रुग्णांची भर पडली असून सध्या सक्रिय रुग्णसंख्या आता १८३ झाली आहे.
mask use
mask usesakal

सोलापूर : कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावरील सोलापूर जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. बहुतेक रुग्ण लक्षणे नसलेले असल्याने प्रशासन रुग्णवाढीकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे चित्र आहे. शनिवारी (ता. २) शहरात २८ तर ग्रामीणमध्ये १८ नवीन रुग्णांची भर पडली असून सध्या सक्रिय रुग्णसंख्या आता १८३ झाली आहे.

कोरोनाच्या दोन लाटा भयानक होत्या. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत रुग्णवाढीबरोबरच मृतांची संख्या लक्षणीय होती. आतापर्यंत कोरोनामुळे शहरातील एक हजार ५०५ तर ग्रामीणमधील तीन हजार ७२७ जणांचा मृत्यू झाला आहे. १४ मार्चनंतर जिल्ह्यात कोरोनामुळे कोणाचाही मृत्यू झाला नव्हता. पण, कोरोना झाल्याने २१ जून रोजी दवाखान्यात उपचार घेणाऱ्या पंढरपूर शहरातील ७६ वर्षीय महिलेचा ३० जून रोजी मृत्यू झाल्याची बाब आरोग्य विभागाच्या रिपोर्टवरून समोर आली आहे. तब्बल साडेचार महिन्यांनी कोरोनाने एका महिलेचा बळी घेतला आहे. दरम्यान, आता १२ वर्षांवरील सर्वांनाच प्रतिबंधित लस टोचली जात आहे. पण, अनेकांनी पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस किंवा दोन्ही डोस घेऊन नऊ महिने पूर्ण झाल्यानंतरही बुस्टर डोस घेतलेला नाही. लसीकरण वाढावे म्हणून अद्याप प्रशासनाने ठोस नियोजन केलेले दिसू नयेत नाही.

करमाळा वगळता सर्वच तालुक्यात रुग्ण
जिल्ह्यातील ११ तालुक्यांपैकी केवळ करमाळा तालुका सध्या कोरोनामुक्त आहे. पंढरपूर तालुक्यात सर्वाधिक ३३ तर माळशिरस तालुक्यात सध्या कोरोनाचे ११ रुग्ण आहेत. उर्वरित तालुक्यात दहापेक्षा कमी रुग्ण आहेत. ग्रामीणमध्ये सध्या ४४ पुरुष आणि ३१ महिला रुग्ण आहेत. तर शहरात ४८ पुरुष आणि ६० महिला रुग्ण उपचार घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com